उर्फी जावेद
मुंबई, 06 जानेवारी: उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला. त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि न्युडिटी पसरवल्याबद्दल अटकेची मागणी केली. त्यानंतर या दोघींचं ट्विटर वॉर चांगलंच रंगलं. एवढंच नाही तर उर्फी विरोधात चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदन दिलं. आता उर्फीचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे टीकेची शिकार होत आहे. ट्रोल्सची पर्वा न करता उर्फी प्रत्येक वेळी तिच्या नवीन शैलीने लोकांना आश्चर्यचकित करते. कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राजकारण्यांवर निशाणा साधत, राजकारण्यांना काही काम नाही का, असा सवाल उर्फीने केला आहे. आता उर्फीचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हेही वाचा - उर्फी वादाचे बदलते ‘रंग’! चित्रा वाघांनाच महिला आयोगाची नोटीस पण साडीच्या रंगावरून पुन्हा चर्चा उर्फी जावेदने तिचा नवीन व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हातात हातकडी घालून काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘तुम्हा सर्वांना मला हँडकफमध्ये पाहायचे होते, बरोबर? तुमची इच्छा पूर्ण केली.’ काही चाहते उर्फीच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत तर काही लोक ट्रोलही करत आहेत.
उर्फी जावेदच्या या व्हिडीओवर जिथे लोक ट्रोल करत आहेत, तिथेच एकाने लिहिले की, ‘उर्फी तू जशी आहेस तशीच राहा.. जगासाठी स्वतःला बदलू नको, स्वतःसाठी जग बदल, मी तुमच्यासोबत आहे.’ असे लिहिले आहे. तर अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. काहींनी तिची तुलना थेट पॉर्न स्टारसोबत केली आहे. उर्फीचा हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला दिसून येतोय. उर्फी जावेदच्या कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राजकारण्यांची खिल्ली उडवत एका चाहत्याने लिहिले की, ‘उर्फीच्या कपड्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बलात्कार पीडितेची, जिला कारमध्ये 5 जणांनी ओढून नेले’. उर्फीने इन्स्टा स्टोरीवर ही कमेंट शेअर केली आणि लिहिले की, ‘माझा मुद्दा हाच आहे’.
विचित्र कपडे घालून रिल्स शेअर करणं हे उर्फीसाठी काही नवीन नाहीये. तसंच तिच्या फॅशन स्टाइलमुळे तिला ट्रोल करणं देखील नवीन राहिलेलं नाहीये. काल उर्फीनं भगव्या रंगाचे विचित्र कपडे घालून बेशरम रंग गाण्यावर व्हिडीओ शेअर केला होता. तर आज स्वतःला बेड्या ठोकून घेतल्या आहेत.