JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बीएडचा विद्यार्थी, उर्फीकडून मिळाली प्रेरणा अन् आता करतोय असं काही...

बीएडचा विद्यार्थी, उर्फीकडून मिळाली प्रेरणा अन् आता करतोय असं काही...

बृजेशने डिझाइन केलेला पेपरचा ड्रेस सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कोण आहे हा उर्फीचा जबरा फॅन पाहा.

जाहिरात

उर्फीचा जबरा फॅन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मे : अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे कायम ट्रोल होत आली आहे. सोशल मीडियावर उर्फीचाच बोलबाला पाहायला मिळत असतो. उर्फीला अनेक जण नाव ठेवतात तर अनेक जण तिच्या हिंमतीची दाद देतात. उर्फीला ट्रोल करणाऱ्यांइतकीच तिला सपोर्ट करण्यांची संख्या देखील आहे. अशातच उर्फीचा एक जबरा फॅन समोर आला आहे. ज्याला उर्फीसारखं मोठं व्हायचंय आणि सोशल मीडियावर व्हायरल देखील व्हायचं आहे. तो देखील उर्फीसारखे कपडे घालून रस्त्यावर पोझेस देत फिरत असतो. बृजेश असं उर्फीच्या चाहत्याचं नाव आहे. तो बिहारच्या भागलपुरच्या रस्त्यावर उर्फी सारखे विचित्र कपडे घालून फिरताना दिसतोय. असाच तो रस्त्यावर फिरताना पाहून रस्त्यानं जाणाऱ्या लोकांनी त्याचे व्हिडीओ काढले असून ते व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.  news18 लोकलने त्याची माहिती काढली असता  असं समजलं की, त्या तरूणाचं पूर्ण नाव हे बृजेश कुमार असं आहे. तो घंटाघर इथे राहणार आहे. त्याला लहानपणापासून मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं होतं. सुरूवातीला तो शाळा आणि कॉलेजमध्ये असलेल्या लहान मोठ्या इव्हेंटमध्ये भाग घ्यायचा. बृजेश आता B.edचं शिक्षण घेतोय. त्याला नोकरी करण्याची अजिबात इच्छा नाहीये. त्याला मॉडेलिंग करायचं असून सोशल मीडिया स्टार व्हायचं आहे. हेही वाचा -  बिग बींच्या सुनेबरोबर रोमान्स करताना कापत होते रणबीरचे हात पाय; ऐश्वर्यानं केली अशी मदत बृजेशची संवाद साधला असता तो म्हणाला, “मला उर्फी जावेद खूप आवडते. मी तिला फॉलो करतो. तिचे कपडे मला आवडतात. ती वेगवेगळे कपडे डिझाइन करून घालते. तसा मी देखील पेपरपासून हा ड्रेस बनवला. मी ही ड्रेस बनवण्यासाठी मेहनत घेतली आहे. मी वेगवेगळे रील्स आणि व्लॉग्स करून सोशल मीडियावर शेअर करतो”.

बृजेश पुढे म्हणाला की, “छोट्या शहरांमध्ये मॉडेलिंग सारख्या गोष्टींकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगळा आहे. मॉडेलिंगमध्ये लहान गावातील लोक मागे पडतात”.  दरम्यान बृजेशने डिझाइन केलेला पेपरचा ड्रेस सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.  बृजेश रस्त्यावर पेपरचा ड्रेस घालून उभा राहिला तोच सगळे त्यांच्याज

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या