JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: ‘लिटल चॅम्प’ फेम स्वरा जोशीची आई आहे 'ही' प्रसिद्ध गायिका

VIDEO: ‘लिटल चॅम्प’ फेम स्वरा जोशीची आई आहे 'ही' प्रसिद्ध गायिका

स्वरा जोशी ही बालगायिका मूळची मुंबईचीच आहे. ती दादर याठिकाणी राहते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जुलै- सारेगमपा ‘लिटल चॅम्प’ (Little Champ) मराठीला नुकताच सुरुवात झाली आहे. या शोमधील छोट्या- छोट्या गायकांनी सर्वांनाचं मंत्रमुग्ध करून टाकलं आहे. प्रत्येक छोट्या स्पर्धकाचं आपलं एक असं खास कौशल्य आहे. या मुलांनी प्रेक्षकांसह परीक्षकांवरही आपल्या गोड आवाजाचा जादू केला आहे. यामध्ये काही स्पर्धक असेही आहेत. ज्यांच्या घरीसुद्धा संगीताचं वातावरण आहे. किंवा त्यांचे आईवडील सुद्धा संगीत क्षेत्राशी निगडीत आहेत. यामधील एक नाव म्हणजे स्वरा जोशी (Swara Joshi) होय. स्वराने आपल्या गोंडस दिसणायाने आणि गोड गाण्याने चाहत्यांना क्लीन बोल्ड केलं आहे. मात्र स्वरा जोशीची आईसुद्धा एक उत्तम गायिका आहे. हे फारच कमी लोकांना माहिती आहे.

स्वरा जोशी ही बालगायिका मूळची मुंबईचीच आहे. ती दादर याठिकाणी राहते. तिच्या आईचं नाव केतकी भावे-जोशी असं आहे. कितेकी यांनी अनेक मराठी कार्यक्रमांमध्ये आपलं गाणं सादर केलं आहे. त्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘सिंगिंग स्टार’ सारख्या कार्यक्रमांमध्ये दिसून आल्या होत्या. तसेच त्यांनी अनेक मराठी अल्बममध्येसुद्धा काम केलं आहे. केतकी यांनीसुद्धा नेहमीच आपल्या आवाजाने सर्वांनाचं मंत्रमुग्ध केलं आहे. केतकी यांनी एका प्रसिद्ध अल्बममध्ये गाणं म्हटलं होतं. ‘मम्मी की लोरिया’ असं त्या अल्बमचं नाव होतं. यामध्ये त्यांनी ‘सोजा बेटा’ ही लोरी म्हटली होती. आणि ती खुपचं लोकप्रियसुद्धा झाली होती. स्वराने सुद्धा आपल्या आईसोबत अनेक स्टेजशो केले आहेत. (हे वाचा: वयाच्या पन्नाशीत राजपाल यादवने बदललं नाव; वाचा काय आहे अभिनेत्याचं नवं नाव ) नुकताच झी मराठीवर सुरु झालेल्या या शोला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. मृण्मयी देशपांडे या शोची होस्ट आहे. या मुलांसोबत तिची मजामस्ती दिसून येते. शिवाय या शो ला मराठीतील लाडके तरुण गायक परीक्षक म्हणून लाभले आहेत. रोहित राऊत, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे अशी त्यांची नावे आहेत. हे स्पर्धक लिटल चॅम्प’ च्या एका पर्वाचे स्पर्धक होते. आणि हा पर्व खूपच लोकप्रिय झाला होता. आत्ता या स्पर्धकांनी चक्क परीक्षक म्हणून या शोमध्ये एन्ट्री केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या