JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / गहना वशिष्टची जामिनावर सुटका; पॉर्न व्हिडीओ प्रकरणी झाली होती अटक

गहना वशिष्टची जामिनावर सुटका; पॉर्न व्हिडीओ प्रकरणी झाली होती अटक

गेले पाच महिने ती पोलिसांच्या ताब्यात होती. अखेर दिंडोशी सत्र न्यायालयानं तिचा जामीन अर्ज मंजूर करत तिला तुरुंगाबाहेर सोडलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 20 जून**:** वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या एका सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात गंदी बात (Gandii Baat) फेम गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) देखील अटक करण्यात आली होती. गेले पाच महिने ती पोलिसांच्या ताब्यात होती. अखेर दिंडोशी सत्र न्यायालयानं तिचा जामीन अर्ज मंजूर करत तिला तुरुंगाबाहेर सोडलं आहे. कोरोनामुळं या प्रकरणाची सुनावणी सातत्यानं लांबणीवर जात आहे. शिवाय खरे आरोपी पकडण्यासाठी आणखी वेळ लागेल. त्यामुळं अभिनेत्रीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ‘माफ करा बाबा, वेळ जरा कठीण आहे’; रिया चक्रवर्तीनं दिल्या पितृदिनाच्या शुभेच्छा काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. या प्रकरणाची आणखी चौकशी केल्यानंतर यामध्ये गहना वशिष्टचं नाव समोर आलं. ती देखील या रॅकेटमध्ये समिल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अंडरटेकर बनून ‘या’ अभिनेत्यानं केली होती अक्षय कुमारसोबत फाईट गहनाला जामिन मिळाला असला तरी देखील तिला कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नाही. तुरुंगात असताना तिला कोरोनाची लागण देखील झाली होती. त्यामुळं तिला आईसोलेशन रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. आजारपण व कोरोनामुळं सुनावणी लांबवली जात असल्यामुळं सध्या तिचा जामिन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या