JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आमचं पप्पा! वहिनीसाहेबांचा कोल्हापुरी ठसका, धनश्री काडगावकरचा बेस्ट VIDEO एकदा पाहाच

आमचं पप्पा! वहिनीसाहेबांचा कोल्हापुरी ठसका, धनश्री काडगावकरचा बेस्ट VIDEO एकदा पाहाच

अभिनेत्री धनश्री काडगावकरने ( Dhanashree Kadgaonkar) साकारलेल्या वाहिनीसाहेब प्रेक्षकांच्या मनावर अजूनही राज्य करत आहेत. वहिनीसाहेबांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 जुलै:  ‘डोक्यात काय फॉल्टय काय?’ असं ठसक्यात  म्हणणाऱ्या ‘तुझ्यात जीव रंगला’ ( Tujhyat Jeev Rangala) मधील वहिनीसाहेब आठवतायत का? हि  मालिका तर केव्हाच संपली आहे मात्र त्यातील वाहिनीसाहेब अजूनही  गाजत आहेत. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता म्हणजेच वहिनीसाहेबांची ( Nandini Vahinisaheb) भूमिका चांगलीच  लोकप्रिय झाली होती. अभिनेत्री धनश्री काडगावकरने ( Dhanashree Kadgaonkar) साकारलेल्या  या वाहिनीसाहेब प्रेक्षकांच्या मनावर अजूनही  राज्य करत आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. याचं  कारण म्हणजे या वहिनीसाहेबांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वहिनीसाहेबांचे कोल्हापुरी ठसका असलेले डायलॉग प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. त्यांच्या ‘आमचं  पप्पा…’ या डायलॉगला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये धनश्री म्हणजेच वाहिनीसाहेब हाच डायलॉग म्हणताना  दिसत आहे. हा छोटासाच व्हिडीओ प्रेक्षकांना खळखळून हसवतो आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा - हम तो ऐसेच है भैया! सुनिल बर्वेनं मारला वडापाव, मिरची अन् गरमागरम भज्यांवर ताव खरंतर  हा व्हिडीओ मालिकेतील नसून झी मराठीवरील  प्रसिद्ध  विनोदि कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या ती’ल  आहे. या कार्यक्रमात चला हवा येऊ द्याच्या कलाकारांसोबत एक स्किट सादर  करताना धनश्री हा वहिनीसाहेबांचा डायलॉग म्हणत आहे. या व्हिडिओमध्ये, ‘आमच्या पप्पांची ऑस्ट्रेलियात पन्नास एकर जमीन आहे आणि त्या पन्नास एकरात कांगारूंचं कुक्कुटपालन करतात’ असं ती आत्मविश्वासानं सांगत आहे. तिच्या या डायलॉगला  प्रेक्षक आणि कलाकारांनी खळखळून हसत दाद दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. आजही प्रेक्षक वहिनीसाहेबांचा  हा व्हिडीओ बघून पोट धरून हसत आहेत सोबत भरपूर लाईक्स आणि शेअर सुद्धा करत आहेत. त्यामुळे वहिनीसाहेबांची जादू अजूनही प्रेक्षकांवर कायम आहे असं म्हणता येईल. नुकताच या वहिनीसाहेबांची भूमिका साकारणाऱ्या धनश्रीने तिचा ‘डोक्यात काय फॉल्टय काय?’ हा डायलॉग लिहिलेला टी-शर्टच बनवून घेतला आहे. तिने अलीकडेच तिच्या सोशल मीडियावरून हा टी -शर्ट घालून तिचे फोटो शेअर केले होते. ‘अजूनही हा डायलॉग आठवणीत ठेवणाऱ्या प्रत्येक कोल्हापूरकरांसाठी हि पोस्ट’ असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोलादेखील तिच्या  चाहत्यांनी भरभरून  प्रतिसाद दिला  होता. आता हा व्हायरल व्हिडीओ पाहून वहिनीसाहेबांची जादू अजून कायम आहे हे स्पष्ट दिसत आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या मुलगा कबीर याला सांभाळून काम करत आहे. आता ती कोणत्या नवीन भूमिकेत दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता  आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या