JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tiger Shroff ला पाहून 'जबरा फॅन'ला आली चक्कर, 'हिरो'ने चाहतीसाठी केलं असं काही... पाहा VIDEO

Tiger Shroff ला पाहून 'जबरा फॅन'ला आली चक्कर, 'हिरो'ने चाहतीसाठी केलं असं काही... पाहा VIDEO

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff Heropanti 2) चा हिरोपंती 2 लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिनेता व्यग्र आहे. हिरोपंती 2 चे जोरदार प्रदर्शन सध्या सुरू आहे. या प्रमोशन दरम्यानच एक घटना घडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 एप्रिल: अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff Heropanti 2) चा हिरोपंती 2 लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिनेता व्यग्र आहे. हिरोपंती 2 चे जोरदार प्रदर्शन सध्या सुरू आहे. या प्रमोशन (Heropanti 2 Promotion Video) दरम्यानच एक घटना घडली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांचे ‘जबरा फॅन’ (Tiger Shroff Fans) आपण अनेकदा पाहतो. मुंबईत तर अनेक ठिकाणी बीटाउनच्या या ताऱ्यांच्या घराबाहेर त्यांची एक झलक पाहायला मिळावी याकरता रांगाही लागतात. अशीच काहीशी अजब ‘Fan Moment’ अभिनेता टायगर (Tiger Shroff Movies) श्रॉफसह घडलेली पाहायला मिळाली आहे. अभिनेता हिरोपंती 2 चे प्रमोशन करत असताना एक त्याची चाहती त्याला पाहूनच बेशुद्ध होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या टीमला मागावी लागली माफी, लता मंगेशकरांच्या गाण्याबाबत दिली चुकीची माहिती या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की जेव्हा तिला चक्कर येते, त्यावेळी तिला सुरक्षा रक्षकांनी घेरलेले असते. तिला ते पाणी देखील पाण्याचा प्रयत्न करतात. तेव्हाही ही चाहती एकदा टायगरला भेटायला द्या, अशी विनवणी करत असावी असं या व्हिडीओत दिसते आहे. यानंतर टायगरचे टीम मेंबर्स तिला स्टेजवर बोलावतात, टायगरही तिला स्टेजवर येण्यासाठी हात देऊ करतो आणि तिला मिठी मारतो. यावेळी टायगर तिची विचारपूस करताना देखील दिसून येत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर शेकडो कमेंट्सही आल्या आहेत.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत की सेलिब्रिटींला भेटण्यासाठी या मुलीने ही टेकनिक वापरली आहे. शिवाय टायगरचा पहिल्या हिरोपंतीमधील डायलॉगही अनेकांनी पोस्ट केला आहे. हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर देखील ट्रेंड होत आहे, त्यावर अनेक रील्सही बनवण्यात आले आहेत. तो डायलॉग म्हणजे- छोटी बच्ची हो क्या? (chhoti bachi ho kya). टायगरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या