JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD: बॅकग्राऊंड डान्सर कशी झाली बॉलिवूडची माँ? पाहा गीता कपूरचा प्रेरणादायी प्रवास

HBD: बॅकग्राऊंड डान्सर कशी झाली बॉलिवूडची माँ? पाहा गीता कपूरचा प्रेरणादायी प्रवास

ती बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायची. पाहूया अभिनेत्रींच्या मागे गर्दीत डान्स करणारी गीता कशी झाली बॉलिवूडची माँ?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 5 जुलै**:** डान्स इंडिया डान्स (Dance India Dance) या शोमधून घराघरात पोहोचलेली गीता कपूर (Geeta Kapoor) ही बॉलिवूडमधील एक नामांकित कोरिओग्राफर म्हणून ओळखली जाते. करीना कपूर, कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, रणवीर सिंग यांसारख्या कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटींना ती आज आपल्या तालावर नाचवते. आज गीताचा वाढदिवस आहे. (Geeta Kapoor birthday) 48 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आज गीता यशाच्या शिखरावर आहे. बॉलिवूड इंडस्ट्री तिला गीता माँ म्हणून हाक मारते. परंतु एक काळ असाही होता जेव्हा ती बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायची. पाहूया अभिनेत्रींच्या मागे गर्दीत डान्स करणारी गीता कशी झाली बॉलिवूडची माँ? शाहरुख खान झाला बेरोजगार? आलिया भट्टकडे करतोय काम देण्याची विनंती गीता कपूरचा जन्म 1973 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. वयाच्या15 व्या वर्षी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. एका स्टेज शो दरम्यान तिला श्रीदेवीसोबत डान्स करण्याची संधी मिळाली होती. या डान्समुळे ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. बॅकग्राऊंड डान्स करत असतानाच तिची ओळख फराह खानसोबत झाली. तिच्यासोबत ती सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करु लागली. ‘कुछ कुछ होता है’, ‘दिल तो पागल है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मै हू ना’, ‘ओम शांती ओम’ या चित्रपटांमध्ये तिनं फराहसोबत काम केलं. राजा हिंदुस्तानी फेम प्रतिभानं का सोडलं बॉलिवूड? 23 वर्ष जगतेय निनावी आयुष्य गीताला खरी लोकप्रियता मिळाली ती डान्स इंडिया डान्स या शोमुळे. या शोमध्ये ती परिक्षक म्हणून झळकू लागली. यामध्येच तिला सर्वप्रथम गीता माँ अशी हाक मारली जाऊ लागली. जवळपास तीन सीझन ती या शोची परिक्षक म्हणून कार्यरत होती. सध्या ती सुपर डान्सर या शोमध्ये परिक्षक म्हणून कार्यरत आहे. कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करणारी गीता आज एक नामांकित नृत्य दिग्दर्शिका म्हणून ओळखली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या