'बस्तर' पोस्टर रिलीज
मुंबई, 26 जून : विपुल अमृतलाल शाह हे बॉलिवूडमधील एक दूरदर्शी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी आजवर अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यांचे भारतीय मनोरंजन उद्योग क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. पण या वर्षी ते द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आले. या वर्षी त्यांच्या द केरला स्टोरी’ चित्रपटाने नवीन इतिहास रचला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 256 कोटींची कमाई केली. सगळ्या देशभर या चित्रपटाची चर्चा झाली. एवढी कमाई करणारा हा एकमेव स्त्रीकेंद्रित चित्रपट आहे. आता या चित्रपटाच्या यशांनंतर द केरला स्टोरी’ चे निर्माते आणि दिग्दर्शक पुन्हा एकत्र आले असून त्यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘द केरळ स्टोरी’ची प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याची जोडी ‘बस्तर’ या चित्रपटासाठी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. निर्मात्यांनी नुकतीच याविषयी घोषणा करत चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. ही जोडी आता ‘बस्तर’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाबद्दल फारसं भाष्य केलेलं नसलं तरी हा चित्रपट सत्यघटनांवरच बेतलेला असणार आहे असा अंदाज आहे.
मात्र, या चित्रपटाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. असे म्हटले जात आहे की विपुल अमृतलाल शाह यांचा आगामी चित्रपट हा आणखी एक धक्कादायक आणि डोळे उघडणारा चित्रपट आहे, जो आणखी एका सत्य घटनेपासून प्रेरित असेल. चित्रपटाचे टायटल अनाऊंसमेंट पोस्टरही याचीच साक्ष देत आहे, ज्यावर ‘देशात वादळ आणणारे छुपे सत्य’ असे लिहिले आहे. Rajpal Yadav: लेकीचा जन्म झाला अन् बायको गेली; राजपाल यादवने सांगितला आयुष्यातील ‘तो’ भयंकर प्रसंग चित्रपटाचं पोस्टर पाहता हा चित्रपट नक्षलवाद आणि कम्युनिस्ट विचारधारेवर भाष्य करणार असल्याचं स्पष्ट होत आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड ३ एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीही हे पोस्टर शेअर करत आगामी चित्रपटाची माहिती दिली. सुदीप्तो सेनच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. याहून अधिक चित्रपटाबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. विपुल अमृतलाल शाह यांचा हा ‘बस्तर’ पुढील वर्षी म्हणजेच ५ एप्रिल २०२४ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. ‘द केरला स्टोरी’च्याच टीमच्या या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक असल्याचं दिसत आहे.
विपुल अमृतलाल शाह हे आंखे, हॉलिडे, फोर्स, कमांडो, वक्त, नमस्ते लंडन, सिंग इज किंग, द केरळ स्टोरी, सनक, ब्लॉकबस्टर वेब शो ह्यूमन यांसारख्या चित्रपटांसह त्यांच्या फिल्मोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 256 कोटींची कमाई केली आहे. आता ‘बस्तर’ ची निर्मिती सनशाईन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड लास्ट मंक मीडियाच्या सहकार्याने करत आहे. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होत आहे, या चित्रपटाच्या स्टारकास्टसह अधिक जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.