JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / The Kapil Sharma Show ने घेतला प्रेक्षकांचा निरोप; 'या' दिवशी टेलिकास्ट होणार शेवटचा एपिसोड

The Kapil Sharma Show ने घेतला प्रेक्षकांचा निरोप; 'या' दिवशी टेलिकास्ट होणार शेवटचा एपिसोड

प्रत्येक आठवड्याच्या शेवटी कपिल शर्माच्या नव्या एपिसोडची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता त्यांचे लाडके विनोदवीर हसवण्यासाठी स्क्रिनवर येणार नाहीत.

जाहिरात

द कपिल शर्मा शो ऑफ एअर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक टीआरपी मिळवणारा आणि प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला एकमेव शो म्हणजे द कपिल शर्मा. या शोनं लाखो प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. प्रेक्षकांच्या आजावरील औषध म्हणजे द कपिल शर्मा शो आहे असं म्हटलं जायचं. शो होस्ट कपिल शर्माला प्रेक्षकांची डोक्यावर घेतलं. अनेक विनोदवीर यानिमित्तानं प्रेक्षकांसमोर आले. द कपिल शर्मा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शोचा शेवटचा एपिसोड लवकरच टेलिकास्ट होणार आहे. कधी आहे कपिल शर्माचा शेवटचा एपिसोड आणि काय आहे शो बंद होण्याचं कारण ? पाहूयात. प्रेक्षकांचा लाडका शो म्हणून कपिल शर्माला प्रसिद्ध मिळाली. पण आता शो प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी कपिल शर्माच्या नव्या एपिसोडची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता त्यांचे लाडके विनोदवीर हसवण्यासाठी स्क्रिनवर येणार नाहीत. हेही वाचा -  CID फेम अभिनेत्याने ठोकला अभिनयाला रामराम; ‘या’ विद्यापीठात पोरांची घेतोय शिकवणी कपिल शर्मा शोचा हा चौथा सीझन होता. मागील वर्षीच चौथ्या सीझनला सुरूवात झाली होती. आता हा चौथा सीझन देखील संपण्याची वेळ आी आहे. कपिल शर्मा शोच्या टीमनं त्यांचं शेवटच्या एपिसोडचं शेड्यूल पूर्ण केलं आहे. लवकरच कपिल शर्माचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होईल असं सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

मीडिया रिपोर्टनुसार, द कपिल शर्मा शोचा शेवटचा एपिसोड 2 जुलैला टेलिकास्ट होणार आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये अभिनेते अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धूलिपाला हे सहभागी होणार आहेत. द नाइट मॅनेजरच्या प्रमोशनसाठी ही टीम कपिल शर्माच्या मंचावर येणार आहे. कपिलनं नुकतेच त्याच्या सोशल मीडियावर त्याचे आणि अर्चना पूरन सिंहचे काही फोटो शेअर केले होते. सीझनचं शेवटचं फोटोशूट असं म्हणत त्यानं शो संपत असल्याची हिंट त्याच्या चाहत्यांना दिली.

कपिल शर्मा शोचा अमेरिकेच्या टीकेएसएसमध्ये 8 जुलै रोजी पहिला शो होणार आहे. कपिल शर्मा आणि टीम लवकरच यूएस टूरसाठी निघणार आहेत. अर्चना पूरण सिंह आणि कृष्णा अभिषेक यात हिस्सा घेणार नाहीत. 2 जुलैसा द कपिल शर्मा शो ऑफ गेल्यानंतर त्या जागी इंडियाज गॉट टॅलेंट हा शो सुरू होणार आहे. या शोमध्ये शिल्पा शेट्टी, किरण खेर आणि बादशाह हे जज म्हणून दिसणार आहे अर्जुन बिजलानी हा शो होस्ट करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या