JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / महाराष्ट्राबाहेर शूटिंग करताना काय त्रास होतो? मयुरी देशमुखनं सांगितला लॉकडाऊनमधील अनुभव

महाराष्ट्राबाहेर शूटिंग करताना काय त्रास होतो? मयुरी देशमुखनं सांगितला लॉकडाऊनमधील अनुभव

मालिकेचा संपूर्ण सेट हा हैद्राबाद मध्ये उभारण्यात आला आहे. याविषयी मालिकेतील (‘Imli’ actress Mayuri) मालिनी म्हणजेच अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) अनुभव सांगितला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 3 मे  :  राज्यातील कोरोनाची गंभीर स्थिती (corona pandemic) पाहता राज्यात संपूर्ण लॉकडाउन (lockdown) जाहीर करण्यात आला. परिणामी चित्रिकरणही बंद करण्यात आलं. त्यामुळे अनेक मालिकांचं चित्रिकरण हे इतर राज्यांत हलवण्यात आले आहे. स्टार प्लसची (star plus)  मालिका ‘इमली’चं (Imli) शुटींग दे हैद्राबाद (Hyderabad) मध्ये सुरु आहे. तर मालिकेचा संपूर्ण सेट हा हैद्राबाद मध्ये उभारण्यात आला आहे. याविषयी मालिकेतील (‘Imli’ actress Mayuri) मालिनी म्हणजेच अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) अनुभव सांगितला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला (TOI) दिलेल्या मुलाखतीत मयुरीने सांगितले, “मागिल वर्षीचा लॉकडाउन पाहता असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की शुटींगसाठी आम्हला शहरचं बदलावी लागतील. खरं सांगायचं तर ज्या प्रकारे महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस वाढत आहेत ते पाहून आम्हाला हैद्राबादला जायचं आहे असं सांगितल्यावर आम्ही सगळे एका पायावर तयार झालो. आम्हाला सगळ्यांना समजलं होतं की जर आम्ही एक दिवसं जरी शुटींग केलं नाही तर निर्मात्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे.”

मयुरीने सांगितलं की मुंबई प्रमाणेच हैद्राबाद मध्येही तसाच घराचा आणि हॉस्पिटलचा सेट उभारण्यात आला (set recreated in Hyderabad) आहे. पुढे मयुरी म्हणाली, “आम्ही इथे जवळपास 50 लोक आहेत. एक अभिनेत्री म्हणून मला नेहमीच ही चिंता वाटायची की आम्ही विना मास्क शुटींग करतो त्यामुळे हा व्हायरस घरापर्यत नको पोहोचायला. पण आता या सगळ्याची चिंता करायची गरज नाही. आम्हाला आमच्या कुटुंबाची फार आठवण येते पण कमीत कमी ते सुरक्षित आहेत.”

देव माणूसमध्ये येणार मोठा ट्विस्ट; डॉक्टरला पकडण्यासाठी ACP नं आखला नवा प्लान

सध्याची परिस्थिती लक्षात घेता अनेक मालिका या बाहेरच्या राज्यांत शुट होत आहेत. हिंदी सोबतच मराठी मालिकाही आता राज्याबाहेर हलवण्यात आल्या आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या