JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मराठी सिनेमा संपवला जातोय', TDMला स्क्रीन मिळेना; दिगदर्शक, कलाकारांनी जोडले हात

'मराठी सिनेमा संपवला जातोय', TDMला स्क्रीन मिळेना; दिगदर्शक, कलाकारांनी जोडले हात

बबन, ख्वाडा सारख्या जबरदस्त सिनेमांनंतर भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी 28 एप्रिल 2023 ला त्यांचा TDM हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला. सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला.

जाहिरात

TDM marathi Movie

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 मे: मराठी सिनेमांना कुठेतरी सुगीचे दिवस आले म्हणत असताना मराठी सिनेमांना न मिळणाऱ्या स्क्रिन्सचा प्रश्न आजही ऐरणीवरच आहे. सध्या अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आलेत तर काही सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. अशातच मराठी सिनेमाला स्क्रिन्स न मिळाल्याने सिनेमाच्या दिग्दर्शक आणि कलाकारांवर हात जोडण्याची वेळ आहे. भाऊसाहेब कऱ्हाडे दिग्दर्शिक TDM हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला मात्र सिनेमा प्रदर्शित होताच त्याला स्क्रिन्स न मिळाल्याचं समोर आलं आहे. थिएटर मालकाला अनेकदा विचारणा करून देखील स्क्रिन्स न मिळाल्याने शेवटी सिनेमाची टीम स्वत: प्रेक्षकांसमोर आली असून त्यांना सिनेमा पाहण्याची विनंती केली आहे. मराठी सिनेमा संपवला जातोय अशी खंत देखील सिनेमाच्या दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे. बबन, ख्वाडा सारख्या जबरदस्त सिनेमांनंतर भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी 28 एप्रिल 2023 ला त्यांचा TDM हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला. सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला. मात्र सिनेमाचे शो फार कमी लावण्यात आलेत. पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या भागात देखील सिनेमाचा केवळ एकच शो लावण्यात आला आहे. ज्या ठिकाणी प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी गेलेत तिथे प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक सिनेमाला पसंती देत असताना सिनेमाला स्क्रिन्स  मिळात नसल्याने कलाकार आणि दिग्दर्शक चांगलेच संतापलेत. त्यांनी थेट थिएटर गाठून प्रेक्षकांशी संवाद साधलाय. हेही वाचा - Maharashtra Shahir: ‘मी अंकुशला पूर्णतः विसरून…’; महाराष्ट्र शाहीर पाहिल्यानंतर शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात TDMची संपूर्ण थिएटरमध्ये आहे. प्रेक्षक देखील सिनेमा उत्तम असल्याचं त्यांना सांगत आहेत.  सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याची विनंती करत दिग्दर्शक आणि कलाकार भावुक झालेत.

यावेळी बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक म्हणाले, “सिनेमा संपतोय, संपवला जातोय. मराठी सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही. माझी विनंती आहे की तुम्ही पाठिंबा दिला तर सर्व शक्य आहे. इतक्या कष्टानं सिनेमा तयार केलाय. पण जेव्हा थिएटरमध्ये यायला पाहिजे तेव्हा येऊ देत नाही. आजच्या काळात मला ही फार गंभीर गोष्ट वाटतेय. आमचाच सिनेमा चांगला आहे असं मी म्हणत नाही.  पण शोच नाही लावले तर लोकांना कळणार कसं की सिनेमा चांगला आहे की वाईट. त्यांना आधी पाहूदेत. ते ठरवतील. मग तुम्ही ठरला की सिनेमा थिएटरमध्ये ठेवायचा की नाही”.

ते पुढे म्हणाले, “वरून सांगण्यात आलं आहे की एकच शो लावायचा. ही परिस्थिती वाईट आहे. माझं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांनी थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहावा. चार दिवसांपासून मी याचा विचार करतोय. ज्या ज्या ठिकाणी शो लागलात तिथे चांगला प्रतिसाद मिळतोय.  चांगला सिनेमा असून असं होत असेल तर ही मराठी सिनेमांसाठी चांगली गोष्ट नाही”. सिनेमाचा प्रमुख अभिनेता पृथ्वीराज थोरातने म्हटलंय, “खूप चांगला सिनेमा आहे तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. सर्वांची इच्छा आहे की हा सिनेमा पाहावा. पण जेव्हा मी थिएटरमध्ये जातो तेव्हा सगळे कौतुक करतात. तुम्ही प्रेक्षक सिनेमा मोठा करू शकता. सर्वांना विनंती करतो. इतका चांगला सिनेमा प्रेक्षकांनी पाहिला पाहिजे”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या