महाराष्ट्र शाहीर संपताच थिएटरमध्ये घडलं असं काही!
सध्या सगळीकडे महाराष्ट्र शाहीर या सिनेमाची चर्चा आहे.
शाहीर साबळेंवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे.
महाराष्ट्र शाहिरला अजय अतुल यांनी संगीत दिलं असून सगळीच गाणी देखील खूपच लोकप्रिय झाली आहेत.
प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सध्या हा चित्रपट सुरू आहे.
अशातच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांनी केलेली कृती दिसत आहे.
शाहीर साबळे यांच्या 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्र गीताचा दर्जा मिळाला आहे.
'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट जेव्हा संपतो तेव्हा शेवटाला 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणं सुरू होतं.
पडद्यावर शाहीरांना हे गीत गाताना पाहून सर्व प्रेक्षकांनी उभे राहून या गीताला मानवंदना दिली.
अत्यंत अविस्मरणीय असा हा क्षण असून त्याचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.
नववधूच्या वेषात सजली मृणाल ठाकूर!
Heading 3
Click Here