मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलिवूडमधील (Bollywood) एक प्रसिद्ध घराणं म्हणजे कपूर घराणं (Kapoor Family). चार पिढ्यापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या कपूर घराण्याचं भारतीय चित्रपट क्षेत्रात मोलाचं योगदान आहे. शो मॅन राज कपूर (Show Man Raj Kapoor) यांच्या रणधीर (Randhir), ऋषी (Rushi) आणि राजीव (Rajeev) या तीन पुत्रांपैकी ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांचे गेल्या दोन वर्षांत एकापाठोपाठ निधन (Death) झालं. आपल्या दोन्ही भावांच्या निधनानं रणधीर कपूर यांना मोठा धक्का बसला आहे. ‘लाईव्ह हिंदूस्थान डॉट कॉम’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 58 व्या वर्षी राजीव कपूर यांचे अचानक निधन झाले. तर गेल्या वर्षी मार्च महिन्यात ऋषी कपूर यांचे कर्करोगाने निधन झाले. दोन्ही लहान भावांचं एकामागं एक निधन झाल्यानं एकटे पडलेले रणधीर कपूर (Randhir Kapoor) चांगलेच खचून गेले आहेत. आपल्या भावांच्या आठवणींना उजाळा देताना ते भावूक होऊन जातात. अलीकडेच त्यांनी याहू इंडियासाठी लिहिलेल्या एका लेखात राजीव कपूर यांच्या आठवणी सांगितल्या असून, त्यांच्या निधनाच्या आदल्या रात्री दोघांमध्ये संवाद झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्या रात्री रणधीर कपूर रात्री दीड वाजता चेंबूरमधील घरी परत आले तेव्हा राजीव कपूर यांच्या खोलीत त्यांना उजेड दिसला त्यामुळे त्यांनी जाऊन बघितलं तर राजीव कपूर दारू पीत (Drinking Alochol) बसलं होतं. रणधीर कपूर यांनी राजीव कपूर यांना इतकं दारू पिणं थांबवून, जेवून झोपायला सांगितलं. हाच त्यांच्यातील शेवटचा संवाद होता. सकाळी रणधीर कपूर यांच्या नर्सने त्यांना उठवून सांगितलं की राजीव कपूर प्रतिसाद देत नाही आहेत. त्यानंतर तत्काळ राजीव कपूर यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र एका तासाभरातच त्यांचा मृत्यू झाला. हे ही वाचा- ‘लग्न त्याच्याशीच करा जो तुमचं वजन नाही मन बघेल…’, KBC स्पर्धकाने जिंकली मनं राजीव कपूर यांचा इतक्या लवकर मृत्यू होईल, असं कधी वाटलं नव्हतं. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे, असं रणधीर कपूर यांनी म्हटलं आहे. ऋषी कपूर यांना कर्करोग (Cancer) झाल्यानं अमेरिकेत (USA) उपचार (Treatment) घेत होते. त्यावेळी आम्ही त्याला भेटून आलो होतो. त्याचं कधीही बरं वाईट होऊ शकतं याची धास्ती होती; पण राजीव इतक्या लवकर जाईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं रणधीर कपूर यांनी म्हटलं आहे. राज कपूर यांचे सर्वांत लहान पुत्र असलेल्या राजीव कपूर यांनी 1983 मध्ये ‘एक जान है हम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. ‘राम तेरी गंगा मैली’ हा त्यांचा चित्रपट गाजला. त्यानंतर लव्हर बॉय आणि जबरदस्त या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं, पण अभिनय क्षेत्रात ते आपला ठसा उमटवू शकले नाहीत.