JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता..’ मालिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर! शो मध्ये होणार नव्या पात्राची एंट्री

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता..’ मालिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर! शो मध्ये होणार नव्या पात्राची एंट्री

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अनेक कलाकारांनी शोला रामराम ठोकला आहे. एवढंच नाही तर या मालिकेच्या दिग्दर्शकांनी देखील शो मधून एक्झिट घेतली. पण आता मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे.

जाहिरात

'तारक मेहता का उल्टा चष्मा'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जानेवारी:  छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ओळखलं जातं. हा विनोदी शो आपल्या हलक्या-फुलक्या विनोदाच्या जोरावर गेली 14वर्षे प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध प्रेक्षकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक हा कार्यक्रम अत्यंत आवडीने पाहताना दिसून येतात. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. दयाबेन, जेठालालपासून ते पोपटलालपर्यंत सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शोमध्ये मोठा बदल झालेला दिसून येत आहे. मालिकेतील अनेक कलाकारांनी शोला रामराम ठोकला आहे. एवढंच नाही तर या मालिकेच्या दिग्दर्शकांनी देखील शो मधून एक्झिट घेतली. पण आता मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे. जवळपास पाच वर्षांआधी या मालिकेतील मुख्य अभिनेत्री दयाबेन म्हणजे दिशा वाकानी हिने ही मालिका सोडली, तेव्हा पासून मालिकेलागळती लागली. एकामागे एक कलाकार मालिका सोडून गेले. निर्मात्यांनी अनेकदा आश्वासन दिले, पण या मालिकेत दया बेन काही परतली नाही. नटू काका ही निधन पावले. त्या पाठोपाठ सोडी, रोशन तारक मेहता, अंजली भाभी अशा अनेक कलाकारांनी मालिका सोडली. त्यामुळे आता नवे कलाकार घेण्याशिवाय निर्मात्यांपूढे पर्याय उरला नाहीय. अशातच मालिकेत एक नवा कलाकार एंट्री घेणार आहे. हेही वाचा - Kartik Aaryan: अन् कार्तिक आर्यनने परेश रावलच्या जोरदार कानाखाली लगावली; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा मालिकेत बागा हे व्यक्तिमत्व चांगलंच लोकप्रिय आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बागाच्या वेगळेपणामुळे या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. बागा प्रमाणेच बावरी ही भूमिका लोकप्रिय झाली. पण ही बावरी काहीच काळासाठी मालिकेत होती. आता ही बावरी पुन्हा मालिकेत एंट्री घेणार आहे. आपल्या नवीन बावरीबद्दल बोलताना या शोचे निर्माते असित कुमार मोदी म्हणाले, ‘मी या व्यक्तिरेखेसाठी एक फ्रेश आणि निरागस चेहरा शोधत होतो. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला अशी बावरी मिळाली. तो शोसाठी पूर्णपणे समर्पित आणि वचनबद्ध आहे. आमचा शो हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे आणि आम्हाला त्यांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. त्यांची नवीना वाडेकर हिला ते आपले प्रेम आणि पाठिंबा देतील याची मला खात्री आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ट्रॅकमध्ये बावरी तिच्या शहरातून परतली आहे. ती बाघाला बागेत भेटायला सांगते. पण नंतर बावरी त्याच्या… पण नंतर बावरी त्याला संदेश पाठवते की तिला हे नाते तोडायचे आहे. तेव्हापासून केवळ बाघा आणि नट्टू काकाच नाही तर संपूर्ण गोकुळधाम सोसायटी चिंतेत आहे. बावरीच्या या वागण्यामागचे कारण प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. आता प्रत्येकाला आपापल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तारक मेहता का उल्टा चष्मा हा सर्वात जास्त काळ चालणारा आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा शो रसिकांचे मनोरंजन करत आहे. आता ही बावरी प्रेक्षकांचं मन जिंकण्यात किती यशस्वी ठरतेय ते पाहणं महत्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या