मुंबई 20 जून**:** तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. गेली 13 वर्ष ही मालिका सातत्यानं लोकांचं मनोरंजन करत आहे. यावरुनच या मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज आपल्याला येतो. या मालिकेनं मिळवलेल्या यशात अभिनेता भव्य गांधी (Bhavya Gandhi) याचा सिंहाचा वाटा आहे. त्यानं तारक मेहतामध्ये साकारलेली टिपेंद्र जेठालाल गडा उर्फ टप्पू ही भूमिका तुफान गाजली. त्याला त्याच्या खऱ्या आयुष्यात देखील टप्पू म्हणूनच हाक मारली जाते. परंतु यशाच्या शिखरावर असताना भव्यने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या करिअरमधील सर्वात चुकीचा निर्णय होता असं म्हटलं जातं. कारण कधीकाळी लाखोंची कमाई करणार टप्पू आज बेरोजगार होऊन घरात बसला आहे. आज भव्य गांधीचा वाढदिवस आहे. 24 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय अनेकांनी तारक मेहतामध्ये परत ये अशी विनंती देखील केली आहे. नीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळं भव्य गांधी जणू सुपरस्टारच झाला होता. घराघरात त्याचा चाहता वर्ग निर्माण झाला होता. परंतु याच दरम्यान त्याला गुजराती चित्रपटांच्या ऑफर देखील मिळू लागल्या होत्या. त्यामुळं भव्यनं स्वत:ला आणखी मोठा प्लॅटफॉर्मवर सादर करण्यासाठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. अर्थात निर्मात्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यानं मालिका सोडू नये म्हणून प्रयत्न करण्यात आले होते. परंतु टप्पूला एकच भूमिका अनेक वर्ष साकारण्याचा कंटाळा आला होता. अन् त्यानं मालिका सोडून दिली. मालिका सोडल्यानंतर भव्यनं एका गुजराती चित्रपटात काम केलं. परंतु तो चित्रपट फ्लॉप झाला. तेव्हापासून तो बेरोजगार म्हणूनच घरात बसला आहे. वडिलांचं कोरोनामुळं निधन झाल्यामुळं घराचा आर्थिक भार त्याच्यावर येऊन पडलाय. त्यामुळं त्याला कामाची गरज आहे. पण सध्या त्याला कामच मिळत नाहिये.