मुंबई 19 जून: ‘गरम मसाला’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘13 बी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी नीतू चंद्रा (Neetu Chandra) ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडसोबतच (Bollywood) तिनं दाक्षिणात्य आणि भोजपूरी सिनेसृष्टीतही काम केलं आहे. परंतु नीतू गेल्या काही काळापासून भारतीय चित्रपटांमध्ये झळकलेली नाही. याबाबत सांगताना तिनं काही धक्कादायक खुलासे केले. तिला बॉलिवूडवाले काम देत नाहियेत. गेल्या वर्षभरात तिला सहा चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळं आता तिनं बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय अभिनेत्रीसाठी जगातील सर्वात श्रीमंत बिझनसमॅन झाला फोटोग्राफर; क्लिक केले ग्लॅमरस फोटो
नीतू येत्या काळात नेव्हर बॅक डाऊन या हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिनं काही धक्कादायक खुलासे केले. ती म्हणाली, “बॉलिवूडमध्ये केवळ ओळखींवर काम मिळतात. इथे टॅलेंडेट लोकांना भाव दिला जात नाही. केवळ स्टारकिड्ससाठीच चित्रपट तयार केले जातात. गेल्या वर्षभरात माझ्याकडून सहा चित्रपट काढून घेण्यात आले. अशा प्रकारामुळंच मी बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अन् मी हॉलिवूडमध्ये संधी शोधू लागले.”
ऐश्वर्यामुळं सुष्मिता सेननं खाल्ले होते आईचे फटके; सांगितला चकित करणारा किस्सा
नीतूनं हॉलिवूडमध्ये तीन बिग बजेट चित्रपट साईन केले आहेत. यापैकी नेव्हर बॅक डाऊन हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी नीतू प्रचंड उत्सुक आहे. “बॉलिवूडवाल्यांच्या नाकावर टीचून मी हॉलिवूडमध्ये काम मिळवलं. तिथं माझा कोणीही गॉडफादर नाही केवळ टॅलेंट पाहून मला संधी मिळतेय. त्यामुळं या बॉलिवूडवाल्यांनी मला काम देणं बंद केलं” असाही आरोप तिनं या मुलाखतीत केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.