JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : तापसी पन्नूनं स्वतःच सांगितलं Thappad Trailer रिपोर्ट करा, काय आहे कारण

VIDEO : तापसी पन्नूनं स्वतःच सांगितलं Thappad Trailer रिपोर्ट करा, काय आहे कारण

तापसीनं स्वतःच्याच ‘थप्पड’ सिनेमाच्या ट्रेलरला रिपोर्ट करण्याचं अपील केलं आहे. नक्की काय आहे या मागचं कारण…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 फेब्रुवारी : अभिनेत्री तापासी पन्नूचा ‘थप्पड’ हा सिनेमा येत्या 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला ज्यात, ‘एक थप्पड पर वो नही मार सकता’ या तापासीच्या दमदार डायलॉगनं सर्वांची मनं जिंकली. या ट्रेलरला सोशल मीडियावर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि यासोबत तापसीच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. पण आता स्वतः तापसीनंच या सिनेमाच्या ट्रेलरला रिपोर्ट करण्याचं अपील केलं आहे. या सिनेमाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं की, तापसी एक वकीलाच्या समोर बसलेली असते. जी वकील तिला एक कायदेशीर नोटीस दाखवत घरी परत जाण्यास सांगते. त्यावर तापसी नकार देते. वकील तिला तिची फॅमिली स्टोरी विचारते. घरातले त्रास देतात? नवऱ्याचं अफेअर आहे का? तुझं अफेअर आहे का? या सर्वाचं उत्तर तापसी नाही असं देते. त्यावर वकील म्हणते, फक्त एका थप्पडमुळे? त्यावर तापसी सांगते एक थप्पड पण तो मला असं मारु शकत नाही. मलायकाशी लग्न करण्यास अर्जुन का करतोय टाळाटाळ, समोर आलं कारण

त्यानंतर आता ‘थप्पड’चा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यात असं दाखवण्यात आलं आहे की, एका पार्टीत तापसीचा नवरा तिला जोरात कानशिलात लगावतो. यानंतर ट्रेवरच्या मध्यातच तापसी पन्नू प्रेक्षकांना सांगते की सर्वात आधी या सिनेमाच्या ट्रेलरला रिपोर्ट करा ज्यामुळे हा ट्रेलर जगातला सर्वाधिक रिपोर्टेड ट्रेलर ठरेल. कारण ज्याप्रकारे प्रेमात एका थप्पडची कोणतीही जागा नाही त्याप्रमाणेच इंटरनेटवरही अशाप्रकारच्या व्हिडीओची कोणतीही जागा नाही. ही एक थप्पड लहान गोष्ट नाही. साराला भरवताना कार्तिक आर्यनचा फोटो VIRAL, कॅप्शन एकदा वाचाच

तापसीच्या या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. लोक या ट्रेलरवर आपली मतं मांडताना दिसत आहेत. ‘थप्पड’ ही कथा एका अशा महिलेची आहे. जी नवऱ्यानं तिच्या कानशीलात लगावल्यानं त्याला घटस्फोट देऊ पाहते. ही भूमिका तापसीनं साकारली आहे. तिच्या एका निर्णयामुळे तिच्या आयुष्यात काय काय बदल घडतात हे या सिनेमात दाखवलं आहे. सलमानच्या बॉडीगार्डकडून पोलखोल; BIGG BOSS 13 च्या विजेत्याचं नाव लीक? ‘मुल्क’ आणि ‘आर्टिकल 15’ सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी थप्पडचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाची निर्मिती टी-सीरिज आणि बनारस मीडिया वर्क्स यांनी केली आहे. तापसीसोबतच या सिनेमात पावइल गुलाटी, रत्ना पाठक, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आझमी आणि राम कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 28 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या