मुंबई 07 ऑगस्ट: तापसी पन्नू ही अभिनेत्री दिवसेंदिवस अनेकानेक चांगल्या प्रोजेक्टचा भाग होताना दिसत आहे. सध्या तापसी अनुराग कश्यपसोबत आणखी एक सिनेमा घेऊन आली आहे ज्याचं नाव ‘दोबारा’ असं आहे. तापसीने करण जोहरच्या चर्चित शो कॉफी विथ करणमध्ये न जाण्याचं कारण एका मुलाखतीत सांगितलं आहे. तापसी सध्या जोमाने आपल्या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहे. योगायोगाने तापसी आणि करण हे शेजारी शेजारी असलेल्या जागीच प्रमोशन करत असल्याचं दिसून आलं होतं. त्याच अनुषंगाने मीडियातून तिला (taapsee pannu koffee with karan show) कॉफी विथ करण शोमध्ये बोलावणं न आल्याबद्दल प्रश्न करण्यात आला. तेव्हा तापसीने सांगितलं, “माझं सेक्स लाईफ एवढं इंटरेस्टिंग नाहीये की त्यामुळे तिला कार्यक्रमात बोलवण्यात यावं.” तापसी नेहमीच आपल्या वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिने कॉफी विथ करणच्या चालू असलेल्या सिझनबद्दल नेमकं आणि सूचक वक्तव्य केल्याने तिच्याबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. कॉफी विथ करणचा सातवा सिझन आत्तापर्यंत टॉप रेटेड शो च्या यादीमध्ये नंबर एकला दिसून येत आहे. अगदी कमी वेळात मिलियनच्या घरात या कार्यक्रमला व्ह्यू मिळाले आहेत. पण हा शो सध्या त्यात होणाऱ्या अनावश्यक सेक्स लाईफबद्दलच्या चर्चांमुळे टीकेचा विषय ठरत आहे. हे ही वाचा- शैलेश लोढाने मालिका सोडल्यानंतर Taarak Mehta Ka Ooltah Chashmah चे निर्माते झाले व्यक्त; म्हणाले… कार्यक्रमात येणाऱ्या कलाकारांच्या पर्सनल आयुष्याबद्दल त्यातूनही सेक्स लाईफबद्दल मर्यादेपलीकडे जाऊन चर्चा होते. सेक्स लाईफचा अतिरेकी उल्लेख आणि त्यावर होणारी सततची चर्चा आता प्रेक्षकांना सुद्धा बोअरिंग आणि त्रासदायक वाटू लागली असल्याचं समोर येत आहे.
तापसीने या प्रश्नाच्या निमित्ताने कार्यक्रमात सुरु असणाऱ्या या मुद्दुयावर सणसणीत भाष्य केल्याचं दिसून आलं आहे. तापसीच्या वर्क फ्रंटवर सांगायचं तर तिचा दोबारा हा सिनेमा टाइम ट्रॅव्हल, थिलर आणि रहस्याने भरलेला आहे. सिनेमाचा ट्रेलर सुद्धा बरीच उत्सुकता वाढवून ठेवताना दिसत आहे. मनमर्जिया सिनेमांनंतर अनुराग आणि तापसी यांचा हा दुसरा चित्रपट आहे. तसंच तापसी येत्या काळात राजकुमार हिरानींच्या डंकी सिनेमात शाहरुखसोबत दिसणार आहे.