शाहरुख खान
मुंबई, 12 जून: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान ची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांशी जोडलेला असतो. चाहत्यांनाही त्यांच्या आवडत्या स्टार्सची चिंता देखील असते. शाहरुख खान अभिनेताच नाही तर त्याची विनोदबुद्धी देखील चांगली आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याच्या चाहत्यांशी संवादही साधतो. अलीकडेच त्याने चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ट्विटरवर ‘आस्क एसआरके’ हे सेशन ठेवलं होतं. तेव्हा चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यानं मजेशीर उत्तरं दिली. एका चाहत्याने त्याला ट्विटरवर ‘तू जेवण केलंस का?’ असा प्रश्न विश्चरला. तेव्हा शाहरुखने मजेशीर उत्तर दिले आणि अशात स्विगीने एन्ट्री मारून सगळ्यांचीच मनं जिंकली. खरतर एका चाहत्याने शाहरुखला ट्विटरवर प्रश्न विचारला, भाऊ तू काय खाल्लेस? त्यावर शाहरुखने परत उत्तर देत त्याच चाहत्याला ‘भाई तू स्विगीत काम करतोस का? त्यावर स्विगीने एंट्री मारताना शाहरुखला विचारले की ‘आम्ही स्विगीचे आहोत, पाठवू का?’ मात्र, यावर शाहरुखकडून कोणतेही उत्तर आले नाही. पण त्यानंतर हा प्रकार ट्विटरवर खूपच ट्रेंड झाला.
त्यानंतर स्विगीचे काही डिलिव्हरी बॉय शाहरुखच्या घराबाहेर पोहोचले. दुसऱ्या ट्विटमध्ये स्विगीने आपल्या काही डिलिव्हरी बॉईजचा फोटो ट्विट केला आणि लिहिले, ‘आम्ही स्विगी वाले आहोत आणि आम्ही डिनर आणले आहे.’ डिलिव्हरी बॉईजचा फोटो मन्नतच्या बाहेर काढला आहे. सनी देओल अन् बिग बींमध्ये आहे 36 चा आकडा! या कारणामुळं बच्चन कुटुंबावर नाराज आहे धर्मेंद्रचा लेक शाहरुख खानची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. या सुपरस्टारची झलक पाहण्यासाठी मुंबईतील बांद्रा येथील त्याच्या ‘मन्नत’ निवासस्थानाबाहेर हजारो चाहते दररोज गर्दी करतात. चाहते आपल्या या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. शाहरुख देखील घराच्या बाल्कनीतून चाहत्यांची इच्छा पूर्ण करतो. पण नुकतंच मन्नत बाहेर असं काही घडलं कि त्याची नोंद थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये झाली आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी मिळून एक विश्वविक्रम केला आहे. शाहरुख खानचे जवळपास 300 चाहते मन्नतच्या बाहेर त्याच पोजमध्ये हात पसरून उभे होते. किंग खाननेही त्याच्यासोबत त्याच्या बाल्कनीत असेच केले. याची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. शाहरुख खानने पठाण या ब्लॉकबस्टर चित्रपटातून पुनरागमन केले. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक व्यवसाय केला. सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचे चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट यावर्षी 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.