स्वरा भास्कर
मुंबई, 19 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. स्वरा भास्करने आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे. स्वरा भास्करने 16 जानेवारीला कोर्ट मॅरेज केलं आहे. आता या दोघांचं मार्च महिन्यात थाटामाटात लग्न होणार आहे. लग्नाच्या बातम्यांदरम्यान स्वरा भास्करचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यामध्ये ती लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. युजर्स स्वरा भास्करचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल करत आहेत. तसेच या फोटोद्वारे स्वरा लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं सांगत आहेत. यासोबतच फोटोमध्ये स्वरा भास्करचा बेबी बंपही दिसत आहे. या फोटोमध्ये स्वरा भास्कर तिचा बेबी बंप तिच्या साडीमध्ये लपवताना दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. हा फोटो व्हायरल होताच नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारी स्वरा भास्कर पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. (हे वाचा: Swara Bhasker wedding: फहादसोबत लग्न करणारी स्वरा आहे कोट्यावधींची मालकीण; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे आलेली चर्चेत )
सोशल मीडियावर लोकांनी स्वराच्या या फोटोवर अनेक कमेंट्स केल्या आहेत आणि तिला या फोटोमागील सत्यदेखील विचारलं आहे.आता आलिया भट्टप्रमाणेच स्वरा लग्नापूर्वीच गरोदर असल्याने तिने घाईत लग्न उरकल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत स्वरा भास्करने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेलं नाहीय. त्याचबरोबर नेटकरी या फोटोवर सतत मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत.तर तिच्या चाहत्यांनी या केवळ अफवा असल्याचं सांगत तिचा बचावही केला आहे.
सुमारे 15 दिवसांपूर्वी फहाद अहमदचा फोटो पोस्ट करत स्वराने त्याला भाऊ म्हणत लग्नाचा सल्लाही दिला होता. स्वरा भास्करने 2 फेब्रुवारीला नवरा फहादच्या वाढदिवशी फहादसोबतचा एक फोटो पोस्ट करत लिहिलेलं की, ‘हॅपी बर्थडे फहाद मियाँ! भावाचा आत्मविश्वास अबाधित राहावा’. स्वराने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करताच तिचे हे जुने ट्विट तुफान व्हायरल होत आहेत. या ट्विटवरुन स्वराला ट्रोल केलं जात आहे.
स्वरा भास्करच्या लग्नाची साडी होती खास- ज्या साडीद्वारे स्वरा आपला बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. ती साडी स्वरासाठी फारच खास होती. अभिनेत्रीने ट्विट करत ही साडी आणि सोबतच हे दागिनेसुद्धा आपल्या आईचे असल्याचं तिने सांगितलं आहे. तसेच आता आपण पारंपरिक लग्नाच्या तयारीत व्यग्र असल्याचंही तिने उघड केलं आहे.