स्वरा भास्कर
मुंबई, 28 एप्रिल : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात भारतीय कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र आजतागायत पैलवानांचं म्हणणं काही ऐकून घेतलं गेलं नाही ना याविषयी कोणता निर्णय झाला आहे. पण आता रिपोर्टनुसार, आता दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणी काही लोक भारतीय कुस्तीपटूंच्या बाजूने बोलत आहेत तर काही त्यांच्यावर देशाची प्रतिमा बिघडवल्याचा आरोप करत आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंचं निदर्शन सुरू आहे. कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळासह अनेक गंभीर आरोप आहेत. आता या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, सोनू सूद आणि पूजा भट्ट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सर्व पैलवान याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करत होते. दरम्यान, आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्वराने ब्रिजभूषण शरण सिंह यांना टोमणा मारला आहे आणि म्हटले आहे की, आमच्या आघाडीच्या कुस्तीपटूला पुन्हा एकदा विरोध सुरू करण्यास भाग पाडले आहे.
स्वरा भास्करने ट्विटरवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते, ‘आमच्या आघाडीच्या कुस्तीपटूंना पुन्हा एकदा लैंगिक छळाचा निषेध करण्यास भाग पाडले आहे. कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिज भूषण यांच्यावर लैंगिक छळाचे अनेक आरोप झाले आहेत. महिना उलटून गेला तरी शासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.’ हा व्हिडिओ ट्विट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हे अतिशय लज्जास्पद आहे की आमच्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय खेळाडूंना लैंगिक छळाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले जात आहे, परंतु आरोपी भाजप खासदाराला सरकारकडून सतत संरक्षण दिले जात आहे.’ असं स्वराने म्हटलं आहे. Actress Death Mystery: प्रत्युषा बॅनर्जी ते श्रीदेवी; आजही उलगडलं नाहीये बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींच्या मृत्यूचं रहस्य स्वरासोबत अभिनेता सोनू सूदनेही ट्विट केले आहे. ‘अन्यायाविरुद्धची कुस्तीची लढाई देशातील खेळाडू नक्कीच जिंकतील, जय हिंद.’ असे सोनू सूदने ट्विटमध्ये लिहिले आहे. तसंच कुस्तीपटूंसाठी आवाज उठवल्याबद्दल पूजा भट्टने राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत सिंह यांचे आभार मानले. तिने ट्विटमध्ये लिहिलय की, ‘जयंत तुमच्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या बाजूने आवाज उठवल्याबद्दल धन्यवाद, बहुतेक लोक त्यांना सोडून गेले आहेत. अव्वल कुस्तीपटूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही आणि पीटी उषा सारखी दिग्गज असे बोलत आहे हे पाहून खूप वाईट वाटते.’ असं तिने म्हटलं आहे.
पीटी उषा म्हणाल्या होत्या की, खेळाडूंनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला नको होते. त्यांनी किमान समितीच्या अहवालाची वाट बघायला हवी होती. त्यांनी जे केले ते खेळ आणि देशासाठी चांगले नाही. हा एक नकारात्मक दृष्टीकोन आहे. याशिवाय पैलवानांमध्ये शिस्तीचा अभाव असल्याचेही पीटी उषा म्हणाल्या होत्या. त्यावर पूजा भट्टने प्रतिक्रिया दिली आहे.