JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ऐश्वर्यामुळं सुष्मिता सेननं खाल्ले होते आईचे फटके; सांगितला चकित करणारा किस्सा

ऐश्वर्यामुळं सुष्मिता सेननं खाल्ले होते आईचे फटके; सांगितला चकित करणारा किस्सा

ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा सुष्मिताला बसला होता फटका; आईनं बुटांनीच घेतला होता तिचा समाचार

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 जून**:** सुष्मिता सेन (sushmita sen) ही बॉलिवूडमधील एक आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मै हू ना, बिवी नंबर वन, आंखे, मैने प्यार क्यू किया यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या सुष्मितानं जवळपास दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिनं मॉडलिंग (sushmita sen modeling) क्षेत्रातून करिअरची सुरुवात केली होती. मिस इंडिया (Miss India in 1994) या सौंदर्य स्पर्धेमुळं सुष्मिताला बॉलिवूडमध्ये पदार्पण करणं काहीसं सोप गेलं. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल ऐश्वर्या रायमुळं (Aishwarya Rai Bachchan) तिनं या स्पर्धेत भाग घेण्यास साफ नकार दिला होता. अन् यासाठी तिला आईचा मारही खावा लागला होता. सुष्मिताचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिनं मिस इंडिया स्पर्धेच्या आधी घडलेला हा किस्सा सांगितला आहे. सुष्मिता आणि ऐश्वर्या राय मिस इंडिया स्पर्धेत एकमेकांचे प्रतिस्पर्धक होते. ऐश्वर्या खूपच सुंदर आहे. त्यामुळं स्पर्धेत उतरण्यापूर्वीपासूनच तिची हवा होती. प्रत्येक जण तिच्या सौंदर्याच्या चर्चा करत होतं. त्यामुळं सुष्मिता घाबरली होती. तिनं ऐश्वर्याच्या भीतीमुळं स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. व तिनं हा निर्णय आपल्या आईला सांगितला. तिच्या या निर्णयामुळं आई संतापली अन् तिनं थेट बुटं फेकून तिला मारलं. ऐश्वर्या जर तुला जगातील सर्वात सुंदर तरुणी वाटेत असेल तर तिच्यासमोर जाऊन हरण्यात काहीच गैर नाही. कारण तू जगातील सर्वात सुंदर तरुणीनं हरवलं आहे. पण भाग न घेता स्पर्धेतून पळ काढण हा निर्णय चुकीचा आहे. प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला आपल्या क्षमता कळणार नाहीत असं सल्ला आईनं तिला दिला. अखेर आईच्या प्रोत्साहनामुळं सुष्मितानं मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. ‘मी स्त्री आहे वस्तू नाही’; ‘आयटम गर्ल’ पुकारताच संदीपा धार संतापली

संबंधित बातम्या

‘कमेंट्स करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, नाहीतर…’; ट्रोलर्सला अभिनेत्रीची धमकी 1994 साली झालेल्या मिस इंडिया या सौदर्य स्पर्धेत सुष्मितानं ऐश्वर्या रायला आव्हान दिलं होतं. ऐश्वर्या या स्पर्धेत विजेता ठरली होती. परंतु सुष्मितानं हार मानली नाही. तिनं त्याच वर्षी मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकून जागतिक किर्ती मिळवली. या विजयानंतर तिनं वृत्तमाध्यमांना काही मुलाखती दिल्या होत्या. या मुलाखतीतच तिनं हा किस्सा सांगितला होता. तिला ही स्पर्धा जिंकण्याची प्रेरणा कशी मिळाली? याबद्दल सांगताना तिनं ऐश्वर्याचा उल्लेख केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या