‘कमेंट्स करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, नाहीतर...’; ट्रोलर्सला अभिनेत्रीची धमकी
या अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोंवर कमेंट्स करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, जर अश्लील प्रतिक्रिया केलीत तर तुमची खैर नाही; अभिनेत्रीनं स्वत:च दिली धमकी
|
1/ 6
उत्तरण या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टीना दत्ता छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
2/ 6
मालिकांमध्ये सोज्वळ सुनेच्य रुपात झळकणारी टीना खऱ्या आयुष्यात मात्र तितकीच बोल्ड आहे. तिनं अलिकडेच स्वत:चे काही टॉपलेस फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमुळं तिला ट्रोलर्सचा सामना देखील करावा लागला होता.
3/ 6
आई-वडिलांनी तुला असेच संस्कार दिले आहेत का? असा सवाल करत काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली होती. आता या ट्रोलर्सला टीनानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
4/ 6
टीनानं फ्री प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं फोटोंवरुन ट्रोल करणाऱ्यांना देखील सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
5/ 6
ती म्हणाली, “इतर सेलिब्रिटींप्रमाणे मी दुर्लक्ष करणार नाही. अश्लील कमेंट्स करणाऱ्यांना मी चांगलाच धडा शिकवेन. त्यामुळं माझ्या पोस्टवर कमेंट्स करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. अन्यथा तुम्हाला तुमची चूक भारी पडू शकते.”
6/ 6
यापूर्वी देखील टीनाला ट्रोल करणाऱ्यांविरोधात तिनं सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारींतर काही ट्रोलर्सनं तिची माफी देखील मागितली होती. या माफीचे स्क्रीनशॉट्स तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले होते.