JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO- बॉल पूलमध्ये फसली Sushmita Sen, बॉयफ्रेंड रोहमन शॉलने अशी केली मदत

VIDEO- बॉल पूलमध्ये फसली Sushmita Sen, बॉयफ्रेंड रोहमन शॉलने अशी केली मदत

ती पूलमध्ये पडते आणि काही वेळ बॉल पूलच्या आतच राहते. तिच्या दोन्ही मुली तिला शोधतात. ती त्यांना दिसते पण सुश्मिताला पूलमधून बाहेर येताच येत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या आपल्या दोन्ही मुलींसोबत आणि प्रियकर रोहमन शॉलसोबत दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर तिने त्यांच्या सुट्ट्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यातीलच एका शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पूलमध्ये पडते आणि काही वेळ बॉल पूलच्या आतच राहते. तिच्या दोन्ही मुली तिला शोधतात. ती त्यांना दिसते पण सुश्मिताला पूलमधून बाहेर येताच येत नाही. यानंतरच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये रोहमनही पूलमध्ये पडतो. सुश्मिता स्वतःला त्या पूलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. पण ती जेवढा प्रयत्न करते तेवढी ती आत अडकत जाते. शेवटी रोहमन तिच्या हाताला धरून तिला बाहेर काढतो.

सुश्मिताने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गेल्या काही काळात मी एवढी मजा कधीच केली नव्हती. आम्हाला इथे आणण्यासाठी अलीशा तुझे आभार.’ सुश्मिता सोशल मीडियावर फार सक्रीय असते. ती अनेकदा तिचे आणि संपूर्ण कुटुंबाचे अनेक फोटो शेअर करत असते. सुश्मिताचा प्रियकर रोहमन तिच्यापासून वयाने फार लहान आहे. दोघांची ओळख सोशल मीडियावरच झाली होती. रोहमन सुश्मिताचा कट्टर चाहता आहे. सुश्मिताच्या कौतुकाने सुरू झालेला त्यांचा संवाद अखेर प्रेमावर येऊन थांबला. स्वप्नील- अमृताच्या पावलांवर पाऊल ठेवत कुणालने केलं धम्माल Bottlecapchallenge Bigg Boss Marahi 2- आपण कितीही केलं तरी यांचीच नावं पुढे- सुरेखा पुणेकर बिग बॉस विजेत्या अभिनेत्याच्या भावाचा बुडून मृत्यू VIDEO:आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या