JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sushmita Sen : सुष्मिता सेनला हार्ट अटॅक; अभिनेत्रीने हेल्थ अपडेट सांगत केला मोठा खुलासा

Sushmita Sen : सुष्मिता सेनला हार्ट अटॅक; अभिनेत्रीने हेल्थ अपडेट सांगत केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्याविषयी चाहत्यांना मोठी बातमी सांगितली आहे.

जाहिरात

सुष्मिता सेन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 मार्च:  बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. तिने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये  तिने तिला काही दिवसांपूर्वी हार्ट अटॅक येऊन गेला होता असा खुलासा केला आहे. अभिनेत्रीनं केलेल्या या खुलाश्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ माजली असून तिची ही  पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. सुष्मिताने वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या पोस्टच्या कॅप्शनची सुरुवात तिच्या वडिलांच्या शब्दाने केली आहे.  तिने लिहिलंय कि, ‘तुमचे हृदय कायम आनंदी ठेवा, आणि जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा ते तुमच्या पाठीशी कायम उभा असेल’ असं माझे वडील नेहमी म्हणतात. Rakhi Sawant: राखी सावंतवर लवकरच बनणार सिनेमा; ड्रामा क्वीनचं वादग्रस्त आयुष्य दिसणार मोठ्या पडद्यावर तिने पुढे म्हटलंय कि, ‘मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला…अँजिओप्लास्टी झाली…आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ज्ञांनी मला ‘माझे हृदय खूप  मोठे आहे’ असं आता सांगून टाकलं आहे.’ तिने पुढे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. तसंच चाहत्यांना संबोधत सुष्मिता सेनने म्हटलंय कि, ‘ही पोस्ट फक्त तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल चांगल्या आणि महत्वाच्या गोष्टीची माहिती देण्यासाठी केली आहे. आता सर्व काही ठीक आहे.  मी पुन्हा नव्या आयुष्यासाठी तयार आहे!!!’ अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या

सुष्मिता सेनची ही  पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून  चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. सुष्मिता 47 वर्षांची आहे आणि तिला नेहमीच फिट राहायला आवडते. अभिनेत्री अनेकदा तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा या वयातील फिटनेस पाहून अनेक चाहत्यांना प्रेरणा मिळते. असे असतानाही तिच्यसोबत घडलेल्या या प्रकाराने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. प्रत्येकजण सुष्मिताच्या पोस्टवर कमेंट करत तिला काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.

सुष्मिताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करून लिहिलं आहे कि, ‘देव तुला आशीर्वाद देईल. लवकर बरी हो.’, ‘तुम्ही स्वतःची काळजी घ्या.’ अश्या कमेंट्स करत चाहते तिला धीर देत आहेत. सुष्मिताच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर येणाऱ्या काळात ती आर्या ३ या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. ‘आर्या’ या वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला. तिला आर्याच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. तसंच येणाऱ्या काळात ती आर्या सोबतच येणाऱ्या काळात ताली या वेबसिरीज मध्ये देखील दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या