JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिण्याची कला; मल्टी टॅलेंटेड सुशांतचा आणखी एक VIDEO VIRAL

एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिण्याची कला; मल्टी टॅलेंटेड सुशांतचा आणखी एक VIDEO VIRAL

सुशांत सिंह राजपूतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर त्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी काही व्हिडीओमधून तू किती टॅलेंटेड आणि जीनियस होता हे दिसून येतं आहे. असाच सुशांतचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये तो एकाच वेळी आपल्या दोन्ही हातांनी लिहितो आहे. याला MIRROR WRITING असं म्हटलं जातं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. सुशांत छिछोर चित्रपटातील आपला सह अभिनेता ताहिर राज भसीनचं नाव दोन्ही हाताने लिहितो.

संबंधित बातम्या

या व्हिडीओतून त्याच्यातील आणखी एक टॅलेंट सर्वांसमोर आलं आहे. एकाच व्यक्तीमध्ये इतक्या कला, इतके गुण कसे काय असू शकतात असा प्रश्न प्रत्येकाला पडेल. सुशांतचे याधीचे व्हिडीओ पाहिल्यानंतर तो फक्त टॅलेंटडच नाही तर मल्टिटॅलेडेट होता हे दिसून येतं आहे. आणि अशा मल्टि टॅलेंटड अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे नेटिझन्स बॉलीवूडवर निशाणा साधत आहेत. हे वाचा -  सुशांतच्या अभिनयाबद्दल दीपिकानं केलं होतं मोठं वक्तव्य, पाहा VIDEO 14 जूनला सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. अभिनयाचं क्षेत्रात येण्यासाठी त्याने इंजीनिअरिंगही सोडलं. सुरुवातीला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून त्याने या क्षेत्रात आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर पवित्र रिश्ता सारख्या मालिकेतून तो खूप प्रसिद्ध झाला. यानंतर ‘काय पो छे’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्येही त्याने एंट्री केली. त्यानंतर ‘धोनीः द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ अशा फिल्म त्याने केल्या. संपादन - प्रिया लाड हे वाचा -  अखेर सोनम कपूरने नेपोटिझमवर दिलं उत्तर; वडिलांचा दाखला देत व्यक्त केली भावना

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या