मुंबई, 17 जुलै: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी (Sushant Singh Rajput Suicide Case) दररोज काही तरी नवी माहिती उजेडात येत आहे. सुशांतचे चाहते तसेच बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची (CBI Probe) मागणी केली आहे. हेही वाचा… ‘मी सुशांतची गर्लफ्रेंड हात जोडून विनंती करते, त्याच्या मृत्यूची CBI चौकशी करा’ एवढंच नाही तर ‘मी सुशांतची गर्लफ्रेंड हात जोडून विनंती करते, त्याच्या मृत्यूची CBI चौकशी करा’, अशा शब्दात रिया चक्रवर्ती हिनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे विनंती केली आहे. मात्र, सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी भाष्य केलं आहे. मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालला आहे. या प्रकरणी CBI चौकशीची गरज नाही, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. सुशांत सिंह राजपूत केस (Sushant Singh Rajput Case) में महाराष्ट्र के गृह मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) ने हाल ही में कहा कि इस मामले में सीबीआई जांच की जरूरत नहीं है. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुशांत सिंह प्रकरण सांभाळण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम आहेत. बॉलिवूडमधील व्यावसायिक स्पर्धा अशा अनेक अँगलने पोलिसांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीत कोणतेही षडयंत्र समोर आलेले नाही. पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती मीडियासमोर दिली, जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. वांद्रे पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. जे जे अभिनेते सुशांतच्या संपर्कात होते. त्या सगळ्यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 35 हून जास्त नागरिकांचा चौकशी केली आहे. हेही वाचा… सुशांतच्या आत्महत्येचं दुबईतील डॉनशी कनेक्शन? भाजप खासदाराची CBI चौकशीची मागणी दरन्यान, 14 जून रोजी सुशांतने मुंबईतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. त्याच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, ही मागणी जोर धरू लागली आहे. अभिनेता शेखर सुमन, भाजप नेत्या रूपा गांगुली, डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यानंतर आता रियाने देखील सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.