जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मी सुशांतची गर्लफ्रेंड हात जोडून विनंती करते, त्याच्या मृत्यूची CBI चौकशी करा'; रिया चक्रवर्तीची अमित शाहांना विनंती

'मी सुशांतची गर्लफ्रेंड हात जोडून विनंती करते, त्याच्या मृत्यूची CBI चौकशी करा'; रिया चक्रवर्तीची अमित शाहांना विनंती

'मी सुशांतची गर्लफ्रेंड हात जोडून विनंती करते, त्याच्या मृत्यूची CBI चौकशी करा'; रिया चक्रवर्तीची अमित शाहांना विनंती

सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीलादेखील (rhea chakraborty) ट्रोल केलं जातं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर अनेकांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. आता सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेदेखील ((rhea chakraborty)  ही मागणी केली आहे. रिया चक्रवर्तीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ही मागणी केली आहे. रियाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 14 जूनला सुशांतने मुंबईतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान त्याच्या आत्महत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी जोर धरू लागली आहे. अभिनेता शेखर सुमन, भाजप नेत्या रूपा गांगुली, डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यानंतर आता रियानेदेखील सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

जाहिरात

मी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती. सुशांतच्या निधनाला आता एक महिना झाला. मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मात्र सुशांतला न्याय मिळायलाच हवा यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी मी हात जोडून करते. सुशांतने असं पाऊल उचलण्याइतपत त्याच्यावर कोणता दबाव होता मला हे माहिती करून घ्यायचं आहे. हे वाचा -  अभिनेत्री रिया चक्रवर्तीला बलात्कार आणि खुनाची धमकी, शेअर केला स्क्रीनशॉट दरम्यान रियाला  सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. त्याचप्रमाणे तिला खुलेआम धमक्या मिळण्याचे सत्र देखील सुरूच होते.  मात्र आता या ट्रोलिंगला आणि धमक्यांना कंटाळून रिया चक्रवर्तीने एक पोस्ट केली आहे. सायबर सेलने यामध्ये लक्ष घालण्याची विनंती रियाने केली आहे.

जाहिरात

रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक इन्स्टा चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या युजरने तिचा बलात्कार आणि खून करण्याची धमकी दिली असल्याचा आरोप तिने या पोस्टच्या माध्यमातून केला आहे.  तिने यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार केल्याची माहिती पोस्ट शेअर करताना दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात