JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / EXCLUSIVE: सुशांतच्या कूकचा खळबळजनक खुलासा, रियाच्याच हातात होतं फायन्शियल कंट्रोल!

EXCLUSIVE: सुशांतच्या कूकचा खळबळजनक खुलासा, रियाच्याच हातात होतं फायन्शियल कंट्रोल!

रिया हिनं सुशांतसह संपूर्ण घर आपल्या कंट्रोलमध्ये घेतलं होतं. कोणाला किती पैसे द्यायचे, कोणत्या गोष्टीवर किती खर्च करावा, याबाबत रिया हिच सर्व निर्णय घेत होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिवाकर सिंह (प्रतिनिधी) मुंबई, 2 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवे खुलासे होत आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. मात्र, सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथे रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्यानंतर पाटणा पोलीस एका वेगळ्या अँगलने याप्रकरणाचा मुंबईत तपास करत आहेत. त्यात सुशांतचा कूक नीरज सिंह यानं ‘न्यूज 18’ शी संवाद साधताना रिया चक्रवर्तीबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत. नीरज सिंह पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आला आहे. हेही वाचा…  राजकीय फायद्यासाठी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण- गृहमंत्री नीरज सिंह यानं सांगितलं की, लॉकडाऊनच्या आधी रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या खास 4 नोकरांची सुट्टी केली होती. त्यात बॉडीगार्ड साहिल, कूक केशव आणि अशोकचा समावेश आहे. सुशांतचे हे खास होते. सुशांतला काय हवं, काय नको याची ते काळजी घेत होते. रिया हिनं सुशांतसह संपूर्ण घर आपल्या कंट्रोलमध्ये घेतलं होतं. कोणाला किती पैसे द्यायचे, कोणत्या गोष्टीवर किती खर्च करावा, याबाबत रिया हिच सर्व निर्णय घेत होती. एवढंच काय तर सुशांतच सर्व फायन्शियल कंट्रोल रियानं आपल्या हातात घेतलं होतं. तसेच सिद्धार्थ पीठानी आणि रियामध्ये खूप जवळीकता होती, मात्र, दोघांमध्ये अफेअर होतं, याबाबत माहिती मिळाली नाही. तीनदा झाली पूजा, पण…. सुशांतच्या घरात एकूण तीनदा पूजा करण्यात आली होती. मात्र, या पूजेला केवळ रिया आणि तिच्या कुटुंबातील लोक उपस्थित होते. मात्र, सुशांतच्या कुटुंबातील एकही सदस्य यावेळी उपस्थित राहात नव्हता. एवढंच काय तर सुशांतच्या बहिणीला देखील निमंत्रित केलं जातं नव्हतं, असं नीरज यानं सांगितलं. नीरज यांन सांगितल की, यूरोप टूरहून परत आल्यानंतर सुशांतची तब्बेत कायम बिघडत होती. तेव्हापासून त्याचं जेवणही कमी झालं होतं. याबाबत आम्हालाही मोठा धक्का बसला होता. तसेच यूरोपहून आल्यानंतर सुशांत वेगळ्याच तणावाखाली वावरत होता, असं जाणवत होतं. अचानक घरी निघून गेली होती रिया… रिया 8 जूनला अचानक घरी निघून गेली होती. तिन मलाच बॅगेत कपडे ठेवण्यास सांगितले होते. यावेळी सुशांत घरातच होता. मात्र, ती त्याला काहीही न सांगता निघून गेली, असं नीरज यानं सांगितलं. सुशांतसाठी दूध, चहा किंवा कॉफी घेऊन केशव जात होता. मात्र, कॉफीमध्ये मंतरलेली पावडर मिसळली जात होती की नाही, याबाबत नीरजनं आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं. मात्र, हे केशव समोर होत होतं का, याबाबत नीरजने खुलासा केला नाही. रिया आणि सुशांतमध्ये खूप प्रेम आहे, असं दिसत होतं. मात्र, तिला सुशांतशी लग्न करायचं होतं की नाही हे सांगू शकत नसल्याचं नीरज यानं सांगितलं. सुशांतच्या डॉक्टरांकडेही रिया स्वत:च जात होती. कधी कधी ती सुशांतला नेत होत. एवढंच नाही तर सुशांतला औषधी देखील तिच देत होती. हेही वाचा… सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण! पार्ट्यावरून भाजप नेत्यानं केलं मोठं वक्तव्य नीरज म्हणाला की, 14 जूनला त्यानेच सुशांत गार पाणी, नारळ पाणी आणि केळी दिली होती. नंतर नास्त्यासाठी विचारायला तो गेला असता सुशांतनं दरवाजा उघडला नाही. नंतर 20 मिनिटांनीही सुशांतनं दरवाजा उघडला नाही. नंतर मग हा प्रकार सिद्धार्थला सांगितला. सिद्धार्थने सुशांतच्या बहिणीला फोन करून बोलावलं. तरी देखील सुशांत दरवाजा उघडत नसल्याच पाहून चावीवाल्यावा बोलावून दरवाजा उघडण्यात आला असता आता सुशांत फासावर लटकलेला दिसला. हे पाहून सगळ्यांना धक्का बसला. यावेळी घरात मी, दीपेश, सिद्धार्थ उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या