JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / गीता कपूरने कोणाच्या नावाचं लावलं कुंकू? नवा PHOTO चाहते चकीत

गीता कपूरने कोणाच्या नावाचं लावलं कुंकू? नवा PHOTO चाहते चकीत

गीता यांनी पोस्ट केलेल्या या फोटोत त्यांनी लाल रंगाचा सलवार सुट परिधान केला आहे तर भांगात लाल कुंकू ही भरलं आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 17 मे : प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका गीता कपूर (Geeta Kapoor) तसेच गीता मां (Geeta Maa) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गीता आपल्या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. सतत नवनवीन फोटो त्या शेअर करत असतात. याशिवाय त्या सध्या ‘सुपर डान्सर’ (Super Dancers) या सोनी टिव्ही (sony tv) वरील रियॅलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत आहेत. पण गीता कपूरने यावेळी पोस्ट केलेल्या फोटोंमुळे अनेकांना प्रश्न पडले आहेत. गीता यांनी पोस्ट केलेल्या या फोटोत त्यांनी लाल रंगाचा सलवार सुट परिधान केला आहे तर भांगात लाल कुंकू ही भरलं आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. गीता या अविवाहित आहेत. त्यामुळे त्यांनी हे कुंकू भांगात नक्की का लावलं असावं असा प्रश्न युझर्सना पडला आहे.

त्यामुळे त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर एकाने विचारलं, तुम्ही लग्न कधी केलत तर दुसऱ्याने विचारलं, सिंदूर कोणाच्या नावाचा आहे. त्यामुळे यामगचं नेमक कारण काय हे तर गीता कपूरच सांगू शकतात. गीता या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. सतत त्यांचे निरनिराळे फोटो त्या पोस्ट करत असतात.

संबंधित बातम्या

सध्या गीता या सुपर डान्सर्स शोमध्ये परिक्षक म्हणून काम करत आहेत. या शो मधील त्यांचे अनेक व्हिडीओज व्हायरल होतात.

‘असा मेसेज दिसल्यास व्हा सावध’; सोनू सूदनं चाहत्यांना केलं सतर्कतेचं आवाहन

तर मागील एपिसोड्स मध्ये कार्यक्रमात अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonakar) यांना उपस्थिती लावली होती. तेव्हा एक परफॉर्मन्सवर गीता मां भावूक झाल्या होत्या. त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरलं झाला होता. ‘सुपर डान्सर’ व्यतिरिक्त गीता यांनी अनेक रियॅलिटी शो मध्ये परिक्षकाची भूमिका बजावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या