जॅकलिन फर्नांडिस
मुंबई, 07 मार्च : महाठग सुकेश चंद्रशेखर सतत मीडियाच्या चर्चेत असतो. सुकेश तिहार तुरुंगात आहे, त्याच्यावर 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचं नाव पुढे आलं. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अनेक महिन्यांपासून अडचणीत आली आहे. जॅकलिनने सुकेशने आपल्याला फसवल्याचा आरोप केला होता. पण आता सुकेशने लिहिलेले एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. होळीच्या मुहूर्तावर त्याने हे पत्र अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससाठी लिहिले आहे. सुकेश म्हणतो की, तो अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तो सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. त्याच वेळी, या प्रकरणात ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे की सुकेशने जॅकलिन आणि तिच्या कुटुंबावर 10 कोटी रुपये खर्च केले आहेत. तो चार वेळा जॅकलीनला चेन्नईत भेटला आहे आणि चार्टर्ड प्लेनवर 8 कोटी रुपये खर्च केले आहेत. या दोघांमध्ये वाद होता. जॅकलिननेही त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. पण आता सुकेशने थेट कारागृहातून जॅकलिनला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे या दोघांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. Swara Bhaskar Wedding: स्वरा भास्करची अनोखी लग्नपत्रिका; पाहुण्यांना खास आमंत्रण देत लिहिलं ‘इन्कलाब झिंदाबाद’ होळीच्या निमित्ताने लिहिलेल्या पत्रात सुकेशने म्हटले आहे की, ‘तू सर्वात अद्भुत व्यक्ती आहेस, मी माझ्या जॅकलिनला होळीच्या शुभेच्छा देतो. त्याने पुढे लिहिले की, रंगांच्या या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला वचन देतो की तुझ्या आयुष्यात जे रंग फिके पडले आहेत किंवा गायब झाले आहेत, ते मी तुम्हाला 100 वेळा परत करीन.’
सुकेशने पुढे लिहिले की, मी माझे वचन नक्कीच पाळेन आणि ही माझी जबाबदारी आहे. तुला माहित आहे की मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, नेहमी हसत राहा आणि त्याने जॅकलिनला लव्ह यू असेही म्हटले आहे. या पत्रात सुकेशने त्याचे कुटुंबीय, समर्थक, मित्र आणि अगदी त्याचा तिरस्कार करणाऱ्यांनाही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सुकेशने जॅकलिनला 52 लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. सध्या तो तुरुंगात आहे. त्याच्यावर 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन जाळ्यात ओढले होते. आता हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेईल हे पाहणं महत्वाचं आहे.