सुचित्रा कृष्णमूर्ती
मुंबई, 10 जुलै : एकेकाळी शाहरुखच्या ‘कभी हा कभी ना’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली अभिनेत्री म्हणजे सुचित्रा कृष्णमूर्ती. मधल्या काही काळात ती चित्रपटसृष्टीपासून दूर होती. पण आता तिने पुन्हा कमबॅक केलं असून ओटीटीवर आपल्या अभिनयानं लोकांचं मनोरंजन करत आहे. ती ‘ओड कपल’ या रोमँटिक फिल्ममध्ये तर ‘गिल्टी माइंड्स’ या क्राईम सीरिजमध्ये दिसली आहे. तिच्या कामाचं कौतुक होत आहे. सुचित्राने आपल्यापेक्षा 30 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न केलं होतं. आता तिने लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सुचित्रा कृष्णमूर्ती हिने बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांपैकी एक असलेला शेखर कपूर यांच्यासोबत लग्न केलं होतं. या दोघांनी 1999 मध्ये लग्न केलं असून 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगी कावेरी असून ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तब्बल 16 वर्षांनंतर आता सुचित्राने शेखरसोबतच्या लग्नाच्या कटू आठवणींबद्दल खुलासा केला. लग्नानंतर सुचित्राने चित्रपटांपासून दूर जात वेगळा मार्ग निवडला.
आता सुचित्राने लग्नांनंतर चित्रपटांपासून दूर जाण्याचं कारण देत, ‘शेखरला तिचे चित्रपटात काम करणे पसंत नव्हतं’ असा खुलासा केला आहे.सुचित्रा कामानिमित्त शेखर कपूरला भेटायला गेली. यादरम्यान तो ‘चॅम्पियन’ नावाच्या चित्रपटासाठी अभिनेत्री शोधत होता. हा चित्रपट तयार झाला नसला तरी मात्र त्यानंतर सुचित्रा शेखरला भेटत राहिली. दोघे अनेकदा तासनतास एकत्र घालवत असत, यादरम्यान शेखर आणि सुचित्रा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सुचित्राने मनाशी ठरवलं होतं की, ती फक्त शेखर कपूरसोबतच लग्न करेन. यानंतर सुचित्रा कृष्णमूर्तीने 22व्या वर्षी आपल्यापेक्षा 30 वर्ष शेखर कपूर सोबत लग्न केलं. Suchitra Bandekar : ‘तो लफडी वगैरे करत…’ सुचित्रा बांदेकरांचं नवऱ्याविषयी केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत सुचित्राने पुढे सांगितले की, तिचे आई वडील या लग्नाच्या विरोधात होते. सुचित्राच्या आईने तिला हे लग्न न करण्याची विनंती केली होती. तरीही तिने हे लग्न केलं. शेखर कपूर त्यावेळी तिच्या आईच्या वयाचे होते, त्यांचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. पण घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलेल्या सुचित्राला शेखरने धोका दिला. त्यांचे दुसऱ्या स्त्रीशी संबंध होते. असा खुलासा सुचित्राने केला आहे. त्यामुळे तिने नवऱ्यापासून घटस्फोट घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
शेखर कपूर हे प्रसिद्ध भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता आहेत ज्यांनी मासूम, मिस्टर इंडिया आणि बॅंडिट क्वीन सारख्या हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. शेखर कपूरचे पहिले लग्न 1984 मध्ये मेधा गुजराल यांच्याशी झाले होते आणि 1994 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांचे दुसरे लग्न त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असलेल्या सुचित्राशी झाले. पण 2007 मध्ये दोघेही वेगळे झाले.