JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Subodh Bhave wedding anniversary: सुबोध मंजिरीची लाँग डिस्टन्स लव्हस्टोरी, सोशल मीडिया नसताना असं व्हायचं बोलणं

Subodh Bhave wedding anniversary: सुबोध मंजिरीची लाँग डिस्टन्स लव्हस्टोरी, सोशल मीडिया नसताना असं व्हायचं बोलणं

(subodh bhave) सुबोध भावे आणि त्याची बायको मंजिरी यांची कमाल लव्हस्टोरी काय आहे नेमकी?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 जुलै: सुबोध भावे या अभिनेत्याकडे प्रेक्षक एक बहुगुणी अभिनेता म्हणून पाहत आले आहेत. त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून त्याने आजपर्यंत अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. सुबोध आणि त्याची पत्नी मंजिरी यांच्या लग्नाचा आज एकविसावा वाढदिवस असून त्यानिमित्ताने सुबोधने एक खास पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. मंजिरी आणि सुबोध या कपलची लव्हस्टोरी अगदी आजच्या जनरेशनच्या तरुणांना जवळची वाटेल अशी आहे. तुम्हाला माहित आहे का ही लव्हस्टोरी? सुबोध आणि मंजिरी यांची ओळख शाळेत असताना झाली होती. त्यांचं हे प्रेम शाळेपासूनच जमलेलं आहे असं त्याच्या पत्नीने एका मुलाखतीत सांगितलं आहे. सुबोध आणि मंजिरी काही काळ लॉन्ग डिस्टन्स (Subodh Bhave long distance relationship) रिलेशनशिपमध्ये सुद्धा राहिले आहेत. त्या काळात ते पत्रव्यवहार करून एकमेकांशी संवाद साधायचे. त्याच्या पत्नीने आसोवा चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या या अनोख्या प्रेमकहाणीबद्दल बराच खुलासा केला आहे. “सुबोध आणि मी एका नाट्यशिबिरात एकत्र भेटलो. तेव्हा मी आठवीत होते तर सुबोधचि नुकतीच दहावी झाली होती. तेव्हपासूनच आम्हाला माहित होतं की आम्ही एकमेकांना आवडतो. पण प्रश्न आला जेव्हा आम्ही पाच वर्ष लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. मी माझ्या बारावीनंतर कुटुंबसकट पुण्याहून कॅनडाला शिफ्ट झाले. त्यावेळी सोशल मीडिया वगरे फारसं काही नसल्याने आमचं अगदी कमी बोलणं व्हायचं. पण त्या काळात आम्ही मोठमोठी प्रेमपत्र एकमेकांना लिहिली. तरी एकमेकांना पत्र मिळून त्यावर उत्तर यायला खूप दिवस जायचे. मी लिहिलेल्या I love you चा जवाब मला साधारण 20-25 दिवसांनी मिळायचा.” हे ही वाचा-  Santosh Juvekar: बापरे! संतोष जुवेकरनं मनोज बाजपेयीला धु धु धुतलं; काय आहे हे प्रकरण? “त्या काळात फोन करणं सुद्धा परवडायचं नाही. अगदी खुशाली विचारेपर्यंत शंभर रुपये संपून जायचे. पण तरी आम्ही एकमेकांबद्दल खूप सिरीयस होतो आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी पुन्हा पुण्यात आले आणि काही काळात आमचं लग्न झालं” असं मंजिरी सुबोध आणि तिच्या नात्याबद्दल सांगते.

सुबोध आणि मंजिरी यांनी एकमेकांना कायम साथ दिली आहे. स्ट्रगलच्या काळात सुबोधला मंजिरीची खूप मदत झाली तर मंजिरीने नोकरी सोडल्यावर सुबोधने तिला आधार दिला असं ती सांगते.

संबंधित बातम्या

सध्या मंजिरी सुबोध आणि तिने सुरु केलेलं प्रॉडक्शन हौस मोठ्या जोमात चालवत आहे. तर सुबोध येत्या काळात झी मराठीवर ‘बस बाई बस’ नावाचा धमाल शो घेऊन येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या