JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बाप लेकीची होणार भेट; अवंतिकाला पाहताच चढणार दादांचा पारा

बाप लेकीची होणार भेट; अवंतिकाला पाहताच चढणार दादांचा पारा

अनेक वर्षांनी हे बाप लेक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. मालिकेच्या येत्या आगात अवंतिका कानिटकरांच्या घरी परतणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जुलै: स्टार प्रवाहवरील ( Star pravah) ठिपक्यांची रांगोळी ( Thipkyanchi Rangoli) या मालिकेत दादा माईंची मुलगी अवंतिका ( Avantika) हिची एंट्री झाली आहे. अभिनेत्री वीणा जगतापने ( Veena Jagtap) अवंतिकाची भूमिका साकारली आहे.  अवंतिकाच्या येण्यानं घरातल्या सगळ्यांना आनंद झाला आहे. मात्र दादा काका या सगळ्यावर नाराज आहे. दादांच्या मनातील अवंतिकाबद्दल असलेला राग काही गेलेला नाही. अनेक वर्षांनी हे बाप लेक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. मालिकेच्या येत्या आगात अवंतिका कानिटकरांच्या घरी परतणार आहे. अवंतिकाला पाहून घरातील सर्वचं खुश होताता मात्र दादा काका आणि अवंतिका यांच्यात पुन्हा एकदा भांडण झाल्याच पाहायाला मिळणार आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून ज्यात अवंतिका कानिटकरांच्या घरी येते. प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, अप्पूच्या सांगण्यावरुन आज दादा काका घरात नाही म्हणून अवंतिका सगळ्यांना भेटण्यासाठी कानिटकरांच्या घरी जाते. घरातील सगळे आपापल्या कामात असतात. अवंतिका घरात जाऊन घर निरखून पाहत असते. तेवढ्यात तिथे दादा काका येतो आणि आपण कोण असं विचारतो. मागे वळून पाहताच अवंतिका आणि दादा काकांची नजरा नजर होते. अवंतिकाला पाहून दादा काका आश्चर्यचकीत होतो.

संबंधित बातम्या

हेही वाचा - Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेच्या टीमची धमाल ट्रिप; 5 जुलैला होणार नव्या सिझनचा श्रीगणेशा! अवंतिकाला पाहून खरंतर दादा काकाला फार आनंद झालेला असतो मात्र त्याचा अहंकार मध्ये येतो आणि ‘तुला पुन्हा घरात पाऊल ठेवताना लाज नाही वाटली’, अशा शब्दात खडे बोल सुनावतो. तेव्हा अवंतिकाही दादांना प्रत्युत्तर देत ‘मी माझ्या माईला आणि घरातील माझ्या माणसांना भेटायला आलीय. अप्पू म्हणाली आज तुम्ही घरी नाहीत म्हणून मी आलेय’, असं सांगते. अप्पूनेच अवंतिका आणि माईची भेट घालून दिली आणि आता कानिटकरांच्या घरात अवंतिकाला परत आणण्यासाठी अप्पूच मदत करत असल्याचं दादा काकाला समजणार आहे. यावर आता दादा काकाची काय प्रतिक्रिया असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे दादा काका अवंतिकाला घरातील सर्वांना भेटू देईल का हेही पाहणे महत्त्वाचं ठरेलं. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचा आणखी एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे अप्पू कानिकटकरांचं घर कायमचं सोडून निघून जाणार आहे. अवंतिकाला घरी आणण्यासाठी अप्पूनं मदत केल्यानं दादा काकांनी अप्पूला शिक्षा दिली आहे, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे मालिकेचे येत्या आठवड्यातील भाग पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या