तब्बल 15 दिवसानंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्याने त्यांचे चाहते आणि जवळचे लोक फार आनंदी झाले होते.
मुंबई, 21 सप्टेंबर : अवघ्या देशाला खळखळून हसवणारा कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे. मागील महिन्याभरापासून राजू मृत्यूशी झुंज देत होता. पण, त्यांची ही झुंज आज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वीच राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मित्रासोबत संवाद साधला होता. हेच त्यांचे शेवटचे शब्द ठरले होते. राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल 15 दिवसानंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्याने त्यांचे चाहते आणि जवळचे लोक फार आनंदी झाले होते. शुद्धीवर आल्यांनतर त्यांनी पहिल्यांदा पत्नीशी संवाद साधला होता. राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र अशोक मिश्रा सुद्धा त्यावेळी हजर होते. शुद्धीवर आल्याची बातमी कळल्यावर… अशोक मिश्रा यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत सांगितलं की, ‘सर्व कॉमेडियन मित्र अंधेरीत एकत्र होते. आम्ही सर्वजण राजूच्या तब्येतीची काळजी करत होतो. राजूभाऊ लवकर बरे व्हावेत म्हणून परवा रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही सर्वजण प्रार्थना करत होतो.अशोक मिश्रा पुढे म्हणाले की, जेव्हा मी झोपेत होतो, तेव्हा माझा फोन वाजला. त्या आवाजाने मला जाग आली. राजूभाऊ यांचे मेहुणे आशिष श्रीवास्तव यांनी तो फोन केला होता. तो खणखणीत आवाजात मला म्हणाला. अशोक आता उठा…किती झोपणार? मला ते सगळं खटकलं. माझ्या मनात विचार आला विचार आला. एकीकडे राजूभाऊ आजारी आहेत आणि हे असे बोलत आहेत. त्यांनी पुढे म्हटलं की, तू झोपला आहेस, तुझा भाऊ तिथे उठला आहे. ऑटो ड्रायव्हर ते गजोधर भैया, राजू श्रीवास्तव यांचा असा होता आयुष्याचा प्रवास आपला मित्र राजू शुद्धीवर आल्याची बातमी ऐकून अशोक मिश्रा यांच्या अंगात आनंद आणि आश्चर्य एकाच वेळी संचारला होता. त्यांनी म्हटलं, ‘राजूला 15 दिवसांनी शुद्ध आली. राजूने डोळे उघडल्यानंतर तो कोण आणि कुठे आहे हे त्याला समजतं की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांची पत्नी धडपडत होती. राजूभाऊंनी हातवारे करुन समजावलं. अशोक मिश्रा यांनी सांगितलं की, राजू श्रीवास्तव यांनी गेल्या 15 दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाहीय. ते कोमात होते. त्यामुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता. त्यांना काहीच बोलता येत नाही. राजू यांनी अडखळत आणि थरथरत्या आवाजात आपल्या पत्नीला म्हटलं - ‘हो, मी ठीक आहे.’ त्यांचे ओठ हलताना दिसत होते. राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने तातडीने तेथे उपस्थित डॉक्टरांना माहिती दिली होती. Raju Srivastav यांना एकेकाळी मिळाली होती जीवे मारण्याची धमकी अखेरची झुंज ठरली अपयशी तब्बल 41 दिवस राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज राजू श्रीवास्तव यांची झुंज अखेर अपयशी ठरली. राजू श्रीवास्तव यांचं एम्स रुग्णालयात निधन झालं. त्यांच्यावर डॉक्टरांची मोठी टीम उपचार करत होती मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले असून आज अखेर राजू श्रीवास्तव यांची प्राण ज्योत मालवली.