मुंबई 30 एप्रिल: देशभरात गेल्या वर्षीपासून कोरोनाचा (Corona)कहर सुरु झाला आहे. तेव्हापासून अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood)हे नाव खूप चर्चेत आहे. गतवर्षी कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाउन जाहिर करण्यात आला होता. त्यावेळी देशभरातील लाखो गरजूंना सोनूने सर्वतोपरी मदत केली होती. त्याच्या या कामाचे सर्व स्तरातून खूप कौतुक झाले. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. अनेक ठिकाणीऑक्सिजन,व्हेन्टिलेटर बेडस,औषधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने एकूणच आरोग्य यंत्रणा,सरकार आणि प्रशासकीय यंत्रणांवर मोठा ताण आला आहे. या स्थितीतही सोनू सूद गरजूंना तसेच रुग्णांना सर्वतोपरी मदत (Help)करीत आहे. नुकताच सोनू सुद डान्स दीवाने (Dance Deewane)या टीव्ही रिअॅलिटी शोच्या एपिसोडमध्ये गेस्ट जज्ज (Guest Judge)म्हणून सहभागी झाला होता. यावेळी सोनूने या शोमधील एका स्पर्धकाच्या संपूर्ण गावाला मोफत अन्न पुरवणार असल्याची घोषणा केली. मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यामधील एका लहान वस्तीतील रोजंदारीवर काम करणारा आणि या शो मधील स्पर्धेक उदय सिंग याने यावेळी सांगितले की सध्याच्या लॉकडाऊनच्या (LockDown) स्थितीत माझ्या गावातील प्रत्येकजण रोजगाराअभावी जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. अनेकांना दररोज पुरेसे अन्न मिळणंही दुरापास्त झालं आहे. “वजनदार नेते आपल्या भागात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा करतायत” फडणवीसांचा गंभीर आरोप उदय सिंगने ही स्थिती नमूद करताच क्षणाचाही विलंब न करता सोनू सूद याने, जोपर्यंत लॉकडाऊन उठवला जात नाही आणि सर्व काही सुरळीत होत नाही तोपर्यंत या संपूर्ण गावाला माझ्याकडून अन्न पुरवलंजाईल अशी घोषणा केली. सोनू सूद म्हणाला की उदय,मला तुमच्या गावातील लोकांना सांगायचंआहे कीलॉकडाऊन 1 महिना,2 महिने किंवा अगदी 6 महिने सुरु राहिला तरी तुमच्या गावातील सर्व ग्रामस्थांना माझ्याकडून अन्न पुरवण्यात येईल. ग्रामस्थांनी काळजी करु नये,तणावात राहू नये,लॉकडाऊन कितीही काळ सुरु राहिला तरी तुमच्या गावातील एकही जण उपाशी राहणार नाही. मी त्यांना अन्न पुरवठा करेन. हा अभिनेता सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीला तोंड देण्यासाठी लोकांना मदत करीत आहे. बेडची व्यवस्था करणे असो अथवाऑक्सिजन सिलिंडर आणि जीवनरक्षक इंजेक्शन्सची सोनू शक्य आहे तितक्या लोकांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात सोनूने परप्रातीयांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी सक्रिय मदत केली होती. तसेच लॉकडाऊनमुळे रोजगार गमवलेल्या बेरोजगारांना त्याने ई-रिक्षांचे (E- Rickshaw)वाटप केले होते.