JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tamasha Live: 'सोशल मीडियावर बोलताना भान ठेवलं पाहिजे'; ट्रोलर्सवर संतापली सोनाली

Tamasha Live: 'सोशल मीडियावर बोलताना भान ठेवलं पाहिजे'; ट्रोलर्सवर संतापली सोनाली

(Sonalee Kulkarni) सोनाली कुलकर्णी सध्या वेगवेगळ्या चॅलेंजमधून चर्चेत येताना दिसत आहे. तिने नुकतंच एका मुलाखतीत सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर आपलं मत मांडलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 8 जुलै: कलाकार म्हणलं की सोबत येतात ते ट्रोलर्स. सध्या मराठी कलाकारांवर निशाणा धरून बरंच ट्रोलिंग होताना दिसत आहे. कलाकारांच्या प्रत्येक हालचालींना टिपणारे हे ट्रोलर्स कधीकधी कलाकरांना दुखावेल अशा प्रतिक्रिया सुद्धा देऊन जातात हे पाहायला मिळालं आहे. याच सगळ्या ट्रोलर्सवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) आक्रमक पवित्र घेतला आहे. तिच्या नव्या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान या सोशल मीडिया ट्रोलिंगबद्दल ती मत मांडताना दिसली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या नव्या सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. सोनाली येत्या काळात संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा live’ (Tamasha Live marathi movie) सिनेमात एका पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. दोन पत्रकारांमध्ये झुंज लागल्यावर काय तमाशा घडू शकतो हे म्युजिकल पद्धतीने संजय जाधव घेऊन येत आहेत असं अद्याप ट्रेलरवरून तरी समजत आहे. सिनेमाचं प्रमोशन करताना एका मुलाखती त सोनालीने ट्रोलिंगबद्दल (Sonalee Kulkarni on trolling) बरंच काही सांगितलं आहे. “सोशल मीडियावर सगळं फुकट आहे, कुणाला चेहरा दिसत नाही म्हणून लोकं वाटेल ते बोलताना दिसतात. सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग हे भीषण आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महान कलाकाराबद्दल सुद्धा लोक काहीही बोलतात तर आपण तर कोण आहोत. इतका त्रास, त्रागा, इतकं उद्धटपणे लोकं कसे व्यक्त होतात हेच मला मुळात कळत नाही. व्यक्त व्हा, पण ते कोणत्या शब्दात व्हावं, कशा भाषेत व्हावं हे आपल्या हातात आहे. हे ही वाचा-  Amruta Subhash: अमृता-संदेशमध्ये ‘या’ गोष्टीने झाला मोठा इश्यू, पाहा हा मजेदार video तुम्हाला लोकांकडून जी आदरपूर्वक, प्रेमळ वागणूक मिळणं अपेक्षित आहे तशीच वागणूक तुम्हीही देणं गरजेचं आहे. प्रत्येकाशी बोलताना आदर, प्रेम संवेदनशीलता असली पाहिजे. त्यामुळे कृपया प्रतिक्रिया देताना विचार करा. आपण काय बोलत आहोत समोरच्यावर त्याचा कसा परिणाम होईल याच भान आणि जबाबदारी असू द्या.” असा शब्दात सोनाली ट्रोलिंगबद्दल व्यक्त होताना दिसली.

संबंधित बातम्या

कलाकारांप्रमाणे प्रसार माध्यमांबद्दल सुद्धा अनेकांमध्ये गैरसमज आहेत. लोक सोशल मीडियावर प्रसार माध्यमांना सुद्धा ट्रोल करताना दिसून येतात. या सिनेमात सोनाली एका पत्रकाराची भूमिका साकारत असल्याने याबद्दल तिला काय वाटत हे ती व्यक्त करताना दिसली. संजय जाधव दिग्दर्शित हा चित्रपट एक संगीतमय पर्वणी असणार आहे. या सिनेमात सोनालीसह सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, मृणाल देशपांडे, आयुषी भावे, नागेश भोसले, पुष्कर जोग अशा कलाकारांची फौज असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या