मुंबई, 18 सप्टेंबर- ‘बिग बॉस १३’ (Bigg Boss 13 Winner) विजेता आणि प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अचानक निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. त्याच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. सिद्धार्थची आई आणि त्याची गर्लफ्रेंड शेहनाज गिलला यातून सावरण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न चालू आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर सिद्धार्थ शुक्लाचा डुप्लिकेट ट्रेंड करत आहेत. तो सिद्धार्थच्या डायलॉग्सवर लीप सिंक करताना दिसून येत आहे. पाहूया कोण आहे हा डुप्लिकेट.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच २ सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. अशा या अचानक घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. मनोरंजन सृष्टीसह सर्वच चाहते शोकसागरात बुडाले आहेत. सिद्धार्थची आई आणि गर्लफ्रेंड शेहनाज यांची अवस्था सुद्धा वाईट आहे. त्या दोघींना सावरण्याचा, धीर देण्याचा सर्वांचा प्रयत्न चालू आहे. तर दुसरीकडे चाहतेही सिद्धार्थच्या आठवणीत गुंतले आहेत. सोशल मीडियावरसुद्धा सिद्धार्थचीच चर्चा सुरु आहे. सतत त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो चाहते शेअर करून अभिनेत्याच्या आठवणीत रमून जातात. नुकताच सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळत आहे. ती गोष्ट म्हणजे सिद्धार्थ शुक्लाचा डुप्लिकेट होय. (**हे वाचा:** Bigg Boss OTT: आज रंगणार महाअंतिम सोहळा; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार शो ) नुकताच सोशल मीडियावर एका तरुणाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आणि हा तरुण हुबेहूब सिद्धार्थ सारखा दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या तरुणाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर दिसून येत आहेत.
ह्या तरुणाचं नाव चंदन विलप्रिन असं आहे. हा तरुण अगदी सिद्धार्थसारखा दिसतो. अभिनेत्याच्या डायलॉग्सवर लीप सिंक करत असताना त्याचे हावभाव, त्याचा चेहरा, शारीरिक हालचाली पाहून लोक त्याला ज्युनिअर सिद्धार्थ शुक्ला म्हणू लागले आहेत. चंदनचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर दिसून येत आहेत. (**हे वाचा:** Bigg Boss Marathi:पहिल्यांदाच बिग बॉसच्या घराची संपूर्ण झलक आली समोर; PHOTO ) सिद्धार्थ शुक्ला फक्त छोट्या पडद्यावरच नव्हे तर बॉलिवूडमध्येही झळकला होता. सिद्धार्थने ‘बाबुल का आंगण छुटे ना’, अजनबी, बालिका वधू, बिग बॉस १३ अशा कार्यक्रमांमध्ये तो दिसून आला आहे. तर ‘हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया’ या चित्रपटात तो वरून धवन आणि आलिया भट्टसोबत महत्वाच्या भूमिकेत झळकला होता. सिद्धार्थने अनेक मॅन हंट टॅलेंट शोजदेखील जिंकले आहेत. सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसच्या घरात असताना शेहनाज गिलसोबत त्याची जवळीकता निर्माण झाली होती. त्यांनी आपलं प्रेमसुद्धा कबूल केलं होतं. हि जोडी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते. या जोडीला सिडनाज म्हणून ओळखलं जातं.