JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमानने सिद्धार्थबाबत केलेली मस्करी ठरली खरी! Bigg boss च्या घरात केली होती भविष्यवाणी

सलमानने सिद्धार्थबाबत केलेली मस्करी ठरली खरी! Bigg boss च्या घरात केली होती भविष्यवाणी

सिद्धार्थ शुक्ला आणि सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात सलमान आणि सिद्धार्थ मस्करी करताना दिसत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 3 सप्टेंबर : प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) 2 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं. या बातमीनंतर त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अनेक आठवणी सध्या त्याचे चाहते शेअर करताना दिसत आहेत. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कूपर रुग्णालयात (cooper hospital) त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. आज मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार झाले आणि सिद्धार्थने शोकाकूल वातवरणात शेवटचा निरोप घेतला. बिग बॉसच्या घरातून सिद्धार्थने लाखो चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. अभिनेता सलमान खानसोबतही (Salman Khan) त्याची चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली होती. त्याच्या अनेक आठवणी त्याचे चाहते सोशल मीडियावर सातत्याने शेअर करत आहेत. त्यातीलच त्याचा आणि सलमानचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. ज्यात सलमान आणि सिद्धार्थ मस्करी करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात असताना एकदा सिद्धार्थ आजारी होता. तेव्हा त्याने लाईव्ह सलमानशी संवाद साधला होता. सुरूवातीला सलमान आणि सिद्धार्थ जोरजोरात हसताना दिसत आहेत. त्यानंतर सलमान म्हणतो, “फॅन्सनी वाचवलं, वरचा नाही वाचवणार. सगळे रडणार, सगळे म्हणतील नाही यार खूप चांगला माणूस होता. ओरडायचा, तोंडावर येऊन बोलायचा, धक्का पण द्यायचा पण माणूस चांगला होता. तो मनाने चांगला होता. या बिग बॉसच्या घरात कोणाला प्रेम होतं, कोणी लग्न करतं तर कोणी कायमचं निघून जातं.” हे ऐकून सिद्धार्थ म्हणतो, “सर तुम्ही हे अगदी खरं बोललात.”

संबंधित बातम्या

सिद्धार्थ बिग बॉस 13 मध्ये दिसला होता. तर तोच या पर्वाचा विजेता देखील ठरला होता. त्यातील शेहनाझ आणि सिद्धार्थची जोडी फारच प्रसिद्ध झाली होती. दोघांचेही लाखो चाहते आहेत. सिद्धार्थवर आज अंत्य संस्कार करण्यात आले. त्यावेळी शेहनाझसह संपूर्ण बिग बॉसच्या घरातील त्याचे मित्रमैत्रीणी उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या