सिद्धार्थ कियारा लग्न
मुंबई, 06 फेब्रुवारी: राजस्थानच्या जैसलमेरमचा सूर्यगड पॅलेस सध्या लग्नसराईने गजबजला आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री कियारा अडवाणी सोबत उद्या म्हणजेच 7 फेब्रुवारीला लग्न करणार आहे. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. सिद्धार्थ आणि कियाराचे चाहतेही या लग्नासाठी प्रचंड उत्सुक आहेत. कियारा आणि सिद्धार्थ देखील कुटुंबियांसोबत विवाहस्थळी पोहचले आहेत. आता या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत. सिद्धार्थ आणि कियारा काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नामुळे सगळ्यांचीच उत्कंठा वाढली आहे. विवाहस्थळी पाहुण्यांचे आगमन होत आहे. या लग्नाला चित्रपटसृष्टीपासून ते व्यावसायिक जगतातील बडे सेलिब्रिटी पोहोचले आहेत. काल कियाराची लाडकी मैत्रीण ईशा अंबानी तिच्या पतीसोबत या दोघांच्या लग्नाला पोहचली आहे. सिद्धार्थ आणि कियाराचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईकही जैसलमेरला पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाहुण्यांच्या आगमनाचे व्हिडिओ आणि फोटो समोर येत आहेत. आता सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या ठिकाणच्या तयारी झलक समोर आली आहे. हेही वाचा - Sidharth- Kiara Wedding: सुनबाईंबद्दल विचारताच सिद्धार्थच्या आईने दिली ‘ही’ रिऍक्शन; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल वेडिंग डेस्टिनेशन सूर्यगढ पॅलेसचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये भव्य दृश्य दिसत आहे. या दोघांच्या लग्नाच्या स्थळाची सजावट अतिशय सुंदर आणि आलिशान दिसत आहे. इथे लोक काम करताना देखील दिसत आहेत. याशिवाय आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये राजस्थानी मुली पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी लोकनृत्य करताना दिसत आहेत. या मुलींची नृत्याची झलक खूपच सुंदर आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला ‘पद्मावत’ चित्रपटाचीही आठवण आल्यावाचून राहणार नाही.
दरम्यान सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहे. मात्र याबद्दल कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला कियारा-सिद्धार्थने बुक केला आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. या दोघांच्या शाही लग्नाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
इतकंच नाही तर विमानतळाबाहेरही अशीच काहीशी डान्स व्यवस्था असल्याचं बोललं जात आहे. येथे येणार्या पाहुण्यांचे पहिले दर्शन म्हणजे लोकनृत्य सादर करणार्या मुली, जे अत्यंत सुंदर आहे. आत्तापर्यंत आलेल्या बातम्यांमध्ये असे म्हटले जात होते की, सिद्धार्थ आणि कियारा 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत, पण ताज्या अपडेटनुसार दोघेही 7 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. आज म्हणजेच 6 फेब्रुवारीला प्री-वेडिंग फंक्शन सहित जोरदार सेलिब्रेशन होणार आहे.