जैसलमेरच्या 'या' महालात पार पडणार सिड-कियाराचं शाही लग्न! पाहा Inside फोटो

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीला ओळखलं जातं.

या आठवड्यात दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

येत्या 6 फेब्रुवारीला दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेस येथे दोघांचा भव्यदिव्य विवाहसोहळा पार पडणार आहे.

4 तारखेपासून दोघांच्या लग्नाचे विधी सुरु होणार आहेत.

सिद्धार्थ आणि कियारा आपल्या जवळच्या लोकांसोबत खाजगी विवाहसोहळा करणार आहेत.

सिद्धार्थ आणि कियाराने आपल्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये तब्बल 84 खोल्यांचं बुकिंग केलं आहे.

इतकंच नव्हे तर पाहुण्यांना व्हेन्यूवर आणण्यासाठी 70 लग्जरी गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

लग्नानंतर 07 तारखेला दोघेही मुंबईत बॉलिवूडकरांसाठी रिसेप्शन देणार आहेत.