JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सिद्धार्थ शुक्ला पंचत्वात विलीन; कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना अश्रू आवरणं कठीण

सिद्धार्थ शुक्ला पंचत्वात विलीन; कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना अश्रू आवरणं कठीण

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्यावर आज मुंबईतील ओशिवारा याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याची आई, बहिणी, सर्वात जवळची मैत्रिणी शेहनाझ गिल आणि संपूर्ण मित्रपरिवाराने पाणावलेल्या डोळ्यांना सिद्धार्थला निरोप दिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 सप्टेंबर: अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्यावर आज मुंबईतील ओशिवारा याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याची आई रिता शुक्ला, बहिणी, सर्वात जवळची मैत्रिणी शेहनाझ गिल आणि संपूर्ण मित्रपरिवाराने पाणावलेल्या डोळ्यांना सिद्धार्थला निरोप दिला. सिद्धार्थला अखेरचं अलविदा करण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. सर्वांनाच अश्रूंचा बांध रोखणं कठी झालं होतं. अभिनेत्यावर अंत्यसंस्कार ब्रह्मकुमारी परंपरेनुसार (Sidharth Shukla Funeral Brahmakumari Rituals) करण्यात आले. सिद्धार्थचा अध्यात्मावर विश्वास होता, याच कारणामुळे तो दीर्घकाळापासून ब्रह्मकुमारी संस्थानाशी जोडलेला होता. याच विधींप्रमाणे त्याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई पोलिसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त होता. कोरोना प्रोटोकॉलचे यावेळी पालन करण्याचा प्रयत्न होता. अंत्यसंस्कारावेळी पावसानेही हजेरी लावली होती.

संबंधित बातम्या

टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla Death) गुरूवारी सकाळी मुंबईत अकाली निधन झालं. त्यानंतर सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यावर शोक व्यक्त केला. सिद्धार्थच्या जवळच्या मित्र मैत्रिणींनी त्याच्या घरी हजेरी लावली होती. आजही अनेक स्टार ओशिवारा याठिकाणी त्यांच्या जवळच्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. बॉलिवूड तसंच टीव्ही कलाकारांनी सिद्धार्थच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या