मुंबई 25 जुलै: अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेनंतर कसून चौकशी करण्यात आली. राज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 27 जुलै पर्यंत त्याची कोठडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिल्पाच्या अडचणींत वाढ होऊन तिचीही कसून चौकशी केली जात आहे. शुक्रवारी उशीरा मुंबई क्राईम ब्रँचने राज आणि शिल्पा यांच्या जुहू येथील बंगल्यावर धाड टाकली. त्यावेळी शिल्पाची काही तास कसून चौकशी करण्यात आली. मिड डेने दिलेल्या वृत्तांनुसार शिल्पाने स्पष्ट शब्दात सांगितलं की, अश्लिल व्हिडीओ बनवणे किंवा अपलोड करणे यात तिचा काहीही हात नाही. पुढे शिल्पाने सांगितलं की, “राज कुंद्रा ज्या व्हिडीओस साठी काम करत होता ते एरोटीक व्हिडीओस (Erotica) आहेत पॉर्न नाहीत. पॉर्न चित्रपटांशी त्यांचा कोणताही संबध नाही.”
तब्बल 21 वर्षे लहान मान्यता सोबत संजय दत्तचे जुळले सुत; असं झालं संजूबाबाचं तिसरं लग्नशिल्पाने तिच्या स्टेटमेंटमध्ये पुढे म्हटलं आहे की, पॉर्न चित्रपटांसंबधी तिला कोणतीही माहिती नाही. तिने दावा केला की, तिचा पती राज कुंद्रा निर्दोष आहे. तिने म्हटलं की, “दुसरे आरोपी पॉर्न बनवत असतील, लंडनमध्ये असणारे राजचे नातेवाईक जे अँपमध्ये व्हिडीओ अपलोड करायचे. त्यात त्यांचा हात असू शकतो. राज अँपसाठी व्हिडीओ बनवायचा.” दरम्यान शुक्रवारी शिल्पाची कसून चौकशी झाली त्यात तिला अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारण्यात आले होते, * तुला हॉटशॉट विषयी माहीती आहे का व ते कोण चालवतं? * हॉटशॉटच्या व्हिडीओ कंटेटविषयी तुम्हाला माहिती आहे का? * तुम्ही कधी हॉटशॉटच्या कामात मदत केली आहे का? * कधी प्रदीप बक्शी ( राज कुंद्राचा मेहुणा) सोबत राज कुंद्राने हॉटशॉट बद्दल चर्चा केली होती? * तुम्ही २०२० मध्ये वियान कंपनीतून बाहेर का पडलात, जेव्हा की तुमचे मोठे शेअर्स होते? * तुम्हाला वियान आणि कॅमरिनमधील पैशांचा व्यवहार माहीत आहे? * अश्लिल चित्रफिती लंडनला पाठवणे आणि अपलोड करण्यासाठी अनेकदा वियानच्या ऑफिसचा उपयोग झाला हे तुम्हाला माहीत आहे का? * तुम्हाला राज कुंद्राच्या सगळ्या व्यवसायांची माहिती आहे? असे प्रश्न शिल्पाला विचारण्यात आले होते.