JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टींची पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार, जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप

शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टींची पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार, जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप

Shilpa Shetty Mother Sunanda Shetty: राज कुंद्रा सध्या तुरुंगात आहे तर शिल्पाची सध्या चौकशी सुरु आहे. अशातच शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जुलै: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे दोघंही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. राज कुंद्रा सध्या तुरुंगात आहे तर शिल्पाची सध्या चौकशी सुरु आहे. अशातच शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फसवणुकीची तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. जुहू पोलीस (Juhu Police Station) स्टेशनमध्ये त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत (Karjat) परिसरातील जमीन संबंधित वादातून सुधाकर घारे या व्यक्तीविरूद्ध ही तक्रार करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

एका जमीन व्यवहारात खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक झाल्याचं सुनंदा शेट्टी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे सुनंदा यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा राज कुंद्रा याच्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे. काय आहे नेमकं प्रकरण 2019 ते फेब्रुवारी 2020 या काळात एका व्यक्तीसोबत कर्जत येथे जमीन खरेदीचा व्यवहार करण्यात आला होता. त्यावेळी सुधाकर घारे यानं खरेदी केलेली जमीन त्याच्या नावावर असल्याचं खोटं सांगितलं आणि खोटे कागदपत्र दाखवले आणि सुनंदा यांना ती जमीन एक कोटी 60 लाख रुपयांना विकली होती. हेही वाचा-  कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे दर वाढले, जाणून घ्या नवे दर काही दिवस झाल्यानंतर त्यांना याबाबतची माहिती मिळाली. सुनंदा यांनी सुधाकरला याबाबत विचारणा केली. त्यावर त्यानं व्यक्तीनं एका राजकीय पक्षाचे नेते त्याच्या जवळचे असल्याचं सांगत सुनंदा यांना न्यायालयात जाण्यात सांगितलं. त्यानंतर सुनंदा यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस स्टेशनमध्ये या जमीन व्यवहारात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये सुनंदा शेट्टींनी कर्जतमधील एका जमीन व्यवहारात खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक झाली असून जमीन विकल्याचा आरोप केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या