मुंबई, 26 फेब्रुवारी : बिग बॉसचा 13 सीझन भांडणं, रुसवे-फुगवे यासोबतच चर्चेत राहिली ती सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल यांची जोडी. या संपूर्ण शोच्या दरम्यान सोशल मीडियावर #SidNaaz खूप ट्रेंड झाला होता. आजही हा ट्रेंड सोशल मीडियावर तसाच टिकून आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली. काही दिवसांपूर्वी शहनाझ गिल आणि पारस छाब्रा यांचा ‘मुझसे शादी करोगे’ हा नवा शो सुरू झाला. ज्यात सिद्धार्थ शहनाझला सपोर्ट करण्यासाठी आला होता. पण नुकतंच काही असं घडलं ज्यामुळे सिडनाझच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. शहनाझ गिलचा नवा शो ‘मुझसे शादी करोगे’ काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. या शोमध्ये सिडनाझचा उल्लेख झालेला पाहून शहनाझचा पारा चढला. त्याचं असं झालं की, शहनाझला इंप्रेस करण्याचा टास्कमध्ये आपल्या मेहनतीनं मिळवलेल्या पॉइन्टमधून प्रत्येकानं तिला असं काही गिफ्ट द्यायचं होतं की ज्यामुळे ती खुश होईल. याच प्रयत्नात बलराज स्यालनं शहनाझला एक टेडीबियर भेट दिला. ज्यावर त्यानं सिडनाझ असा स्टिकर लावला होता. जे पाहिल्यावर खुश होण्याऐवजी त्यांच्यावर रागावलेली पाहायला मिळाली. स्टार अभिनेता लग्नानंतर दुसरीसोबत राहिला रिलेशनशिपमध्ये आणि तिसरीच्या…
शहनाझनं त्या टेडीबियरवरील सिडनाझचा स्टीकर काढून स्वतःकडे ठेऊन घेतला आणि तो टेडीबियर जाळून टाकला. या टास्कमध्ये पारस छाब्रा आणि शहनाझ यांना न आवडलेले गिफ्ट जाळून टाकायचे होते. शहनाझला मिळालेल्या गिफ्टमधील झुमके सुद्धा तिला आवडले नाही त्यामुळे तिनं ते सुद्धा जाळून टाकले आणि म्हणाली, मला इंप्रेस करणं एवढं सोपं नाही. वरुण धवन आहे अब्जावधींचा मालक, वाचा किती आहे त्याची एकूण संपत्ती या टास्कमध्ये पारस छाब्रा सुद्धा खूप रागावलेला पाहायला मिळाला. त्यानं स्पर्धकांनी दिलेले कार्ड्स, बुके आणि गिफ्ट जाळून टाकले. पारसनं सांगितलं, पहिलं तुम्ही मला ओळखा आणि मगच मला गिफ्ट द्या. पारसनं जेव्हा सर्वांचे गिफ्ट जाळून टाकल्यावर स्पर्धक अंकिता खूपच हर्ट झालेली पाहायला मिळाली आणि रडू लागली. तिला मनवण्यासाठी पारस गालावर किस करतो. त्यानंतर अंकिता खुश होते आणि त्याच्यासोबत फ्लर्ट करू लागते. सनी लिओनी जखमी झाली की काय? मेकअप बघून चाहते झाले हैराण, पाहा VIDEO