वरुण धवन आहे अब्जावधींचा मालक, वाचा किती आहे त्याची एकूण संपत्ती
वरुण धवन सध्या 'कुली नंबर 1' च्या रिमेकच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून या सिनेमात तो सारा अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
|
1/ 7
अभिनेता वरुण धवनने फार कमी वेळात आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमधील आपलं स्थान बळकट केलं आहे. त्यामुळेच तो सध्या तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
2/ 7
करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा वरुण धवन आता पर्यंत 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'बदलापूर', 'जुडवा 2', 'एबीसीडी 2' या सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
3/ 7
एकामागोमाग एक हिट सिनेमा देणारा वरुणची एका वर्षाची कमाई पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल आणि यातील खास गोष्ट ही की, सिने करिअरमधून वर्षाला 35 कोटी रुपये कमवणारा हा अभिनेता काही कोटींचा नाही अब्जांचा मालक आहे.
4/ 7
मीडिया रिपोर्टनुसार वरुण धवनची एकूण संपत्ती 120 कोटी रुपये म्हणजेच 1 अब्जाहून जास्त आहे. तर त्याची वर्षाची कमाई 35 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
5/ 7
मागील वर्षीच वरुणनं एक अलिशान घर खरेदी केलं होतं. ज्याची किंमत जवळपास 20 कोटी रुपये एवढी आहे. या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाला होता.
6/ 7
याशिवाय वरुणकडे अनेक लक्झरी कारचं कलेक्शन आहे. यात Audi Q7चा सामावेश आहे. या कारची किंमत 85 लाख रुपये एवढी आहे.
7/ 7
सुत्राच्या माहितीनुसार वरुण एका सिनेमासाठी जवळपास 21 कोटी रुपये एवढं मानधन घेतो. सध्या तो 'कुली नंबर 1' च्या रिमेकच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून या सिनेमात तो सारा अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.