JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बालपणीच्या कटू आठवणीमुळे शरद केळकर भावुक; या कारणामुळे चिडवायचे लोक

बालपणीच्या कटू आठवणीमुळे शरद केळकर भावुक; या कारणामुळे चिडवायचे लोक

“तोतरा असल्यामुळे मी अभिनय (Acting) करू शकेन असा विचार कधीच माझ्या मनात आला नव्हता. मी तोतरा होतो म्हणून अभिनय ही गोष्ट माझ्यासाठी खूपच दूरची होती.”

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 5 जुलै: टीव्ही इंडस्ट्रीत स्वत:चा ठसा उमटवल्यानंतर अभिनेता शरद केळकरने (Sharad Kelkar) बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतीच शरदची ‘द फॅमिली मॅन 2 (The Family Man 2) ही वेबसीरिज रिलिज झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर शरदने माध्यमांशी संवाद साधताना आपल्या लहानपणच्या गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. शरदच्या या अडचणीमुळे लोक त्याला सतवायचे. खूप त्रास पण द्यायचे. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार शरद म्हणाला, ‘लहानपणी मी तोतरा होतो म्हणजे मला शब्दांचे स्पष्ट उच्चार करता येत नव्हते. त्यामुळे लहानपणी माझे मित्र (Friends), आजूबाजूचे लोक माझी खूप चेष्टा करायचे. पण मी त्यात सुधारणा केली आणि आज बघा मी अशा क्षेत्रात काम करतोय जिथं माझ्या बोलण्याच्या कौशल्याला प्रचंड महत्त्व आहे. ’ 28 वर्षांपूर्वी शेफाली शाह कशी दिसायची? व्हायरल झालं जुने Photo अनेकदा अपयश शरद केळकरने यापूर्वी देखील आपल्या तोतरेपणाचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता की, तोतरा असल्यामुळे मी अभिनय (Acting) करू शकेन असा विचार कधीच माझ्या मनात आला नव्हता. मी तोतरा होतो म्हणून अभिनय ही गोष्ट माझ्यासाठी खूपच दूरची होती. त्यामुळे मला खूप ठिकाणी अपयशाचा सामनाही करावा लागला. राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी आणखी एकाला अटक; व्हिडीओत नाव घेतलेला नरेश मिस्री सापडला तो म्हणाला, ‘ मी खूपच तोतरं बोलायचं म्हणून मला कायमच नाकारलं जायचं. पण या नकारानेच मला मजबूत बनवलं. त्यामुळे मला माझ्या उणिवा सुधारायची ताकद मिळाली. दोन वर्षांत मी तोतरं बोलण्याच्या सवयीतून बाहेर पडलो आणि नीट बोलायला लागलो. नकार किंवा अपयश हे चांगलं असतं असा माझा विश्वास आहे. अपयशामुळे तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही अधिक जोमाने प्रयत्न करता आणि त्याची ताकद तो नकारच तुम्हाला देत असतो. ’ शरद केळकर अभिनित तान्हाजी आणि लक्ष्मी हे चित्रपट नुकतेच रिलिज झाले असून त्यांना चांगलं यशही मिळालं आहे. त्यानंतर द फॅमिली मॅन 2 मधलं शरदचं कामही लोकांना खूप आवडलं. त्यामुळे तो हे यश सध्या साजरं करतो आहे. प्रेक्षक फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सिझनची आता वाट पाहत आहेत. या मालिकेतला एक प्रश्न सतत प्रेक्षकांच्या मनात आहे तो म्हणजे लोणावळ्यात काय घडलं होतं? शरदने एक हिंटही दिली होती की सूची आणि श्रीकांत यांच्यामध्ये आल्यास शरदनी केलेल्या व्यक्तिरेखेला जीवघेण्या धमक्या आल्या होत्या. आता प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे बघूया काय होतं ते या मालिकेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या