JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Shalva kinjawdekar : शाल्वच्या आयुष्यातील ही जिगीषा नक्की आहे तरी कोण? तिला अभिनेता म्हणतोय 'माय लव्ह'

Shalva kinjawdekar : शाल्वच्या आयुष्यातील ही जिगीषा नक्की आहे तरी कोण? तिला अभिनेता म्हणतोय 'माय लव्ह'

अभिनेता शाल्व किंजवडेकर त्याच्या हॉट लुक्समुळे तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. शाल्वची गर्लफ्रेंड आहे हे सर्वांनाच माहिती आहे मात्र गर्लफ्रेंड सोडून शाल्व दुसऱ्याच कोणाला माय लव्ह म्हणताना दिसत आहे. कोण आहे शाल्वच्या आयुष्यातील ती महत्त्वाच्या व्यक्ती जाणून घ्या.

जाहिरात

Shalva kinjawadekar

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 ऑगस्ट : झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर  पदार्पण करणारा  अभिनेता म्हणजेच  शाल्व किंजवडेकर. हा अभिनेता पदार्पणातच प्रचंड लोकप्रिय झाला. त्याची या मालिकेतील ओम ही व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अभिनेता शाल्व किंजवडेकर त्याच्या हॉट लुक्समुळे तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. शाल्वच्या लुक्स आणि अभिनयासोबतच अजून एका गोष्टीची प्रकर्षाने चर्चा होते ती म्हणजे त्याची गर्लफ्रेंड. शाल्व गर्लफ्रेंडबरोबरचे अनेक फोटो शेअर करत असतो मात्र आता शाल्व दुसऱ्याच कोणाला तरी माय लव्ह म्हणताना दिसतोय. कोण आहे शाल्वच्या आयुष्यातील दुसरं प्रेम जाणून घ्या. अभिनेता शाल्व किंजवडेकर सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोची प्रचंड चर्चा होतेय. हा फोटो आहे त्याच्या बाईकचा. शाल्वला लहानपणापासून वेगवेगळ्या गाड्यांची आवड आहे. त्याने नुकताच त्याच्या बाईकसोबत सोशल मीडियावर पोस्ट टाकलीये. खरतर शाल्वला स्पोर्ट्स बाईकची खूप आवड आहे. लहानपणी धूम या चित्रपटातील बाईक बघून त्याने तशीच बाईक घ्यायचं स्वप्न बघितलं होतं . गेल्यावर्षी त्याने ती सुपरबाइक घेऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं होतं. त्याने त्याची ड्रीम बाईक घेतली होती. आज त्याच हे स्वप्न पूर्ण होऊन एक वर्ष झालंय. त्या निमित्ताने त्याने एक फोटो शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

त्याने त्याच्या बाईकसोबतच फोटो शेअर करत ‘happy  anniversary my love’ असं कॅप्शन दिलं  आहे. तसेच ‘तुला एक वर्ष झालं यावर विश्वास बसत नाहीये.’ असंही त्याने म्हंटल आहे. शाल्वच्या या अनोख्या प्रेमाबद्दल त्याच्या चाहत्यांनाही चांगलीच कल्पना आहे. त्यांनी शाल्ववर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याचा पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी ‘हैप्पी बर्थडे जिगीषा’, हैप्पी अनिव्हर्सरी शाल्व आणि जिगीषा’  असं म्हणत त्याला शुभेछया दिल्या आहेत. आता ही जिगीषा कोण आहे? तर त्याच उत्तर आहे त्याची बाईक. पण  आता शाल्वच्या चाहत्यांनी त्याच्या बाईकला जिगीषा का म्हंटल आहे हे फक्त तोच सांगू शकेल. हेही वाचा - Vijay DeveraKondaला पाहून चाहते ‘आऊट ऑफ कंट्रोल’; कोणी रडतंय तर कोणी जागेवरच बेशुद्ध, पाहा VIDEO शाल्व किंजवडेकरला लहानपणापासूनच गाड्यांची आवड आहे. त्याने लहानपणीचे बाईकवर बसलेले फोटो शेअर केले होते. त्याच्या विविध फोटोवरून त्याचं  हे बाईक प्रेम वारंवार दिसून आलंय. मात्र त्याच्या या जिगीषा नावाच्या ड्रीम बाईक मागे नक्की काय गोष्ट आहे याची चाहत्यांना उत्सुकता आहे. शाल्व किंजवडेकरच्या ओम या भूमिकेनंतर त्याला आता नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या