मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Vijay DeveraKondaला पाहून चाहते 'आऊट ऑफ कंट्रोल'; कोणी रडतंय तर कोणी जागेवरच बेशुद्ध, पाहा VIDEO

Vijay DeveraKondaला पाहून चाहते 'आऊट ऑफ कंट्रोल'; कोणी रडतंय तर कोणी जागेवरच बेशुद्ध, पाहा VIDEO

vijay deverakonda

vijay deverakonda

Vijay DeverKondaला पाहून चाहते झाले 'आऊट ऑफ कंट्रोल'; काही लागले रडायला तर काही झाले बेशुद्ध, पाहा VIDEO

    मुंबई, 1 ऑगस्ट : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनन्या पांडे यांचा आगामी चित्रपट 'लाइगर' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या दोघेही 'लाइगर' सिनेमाच्या जोरदार प्रमोशमनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशनसाठी विजय आणि अनन्या वेगवेगळ्या ठिकाणी जात असलेले पहायला मिळत आहे. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेनी मुंबईतील एका मॉलमध्ये सिनेमाच्या प्रमोशसाठी हजेरी लावली होती. यावेळी विजयच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणवर गर्दी केलेली पहायला मिळाली. विजयला पाहून चाहत्यांच्या गर्दीला सांभाळणं कठीण झालं होतं. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेनं नुकतंच मुंबईतील एका मॉलमध्ये 'लाइगर' सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. यावेळी मॉलमध्ये विजयच्या चाहत्यांचा मोठा लोट पहायला मिळाला. विजयला पाहून मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. विजयला पाहून काही मुली रडायल्या लागल्या तर काही मुलीला चक्करही आली. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. गर्दीला सांभाळणं कठीण होऊ लागल्यानं विजय आणि अनन्याला तेथून निघावं लागलं. त्यामुळे हा इव्हेंट काही कालावधीतच रद्द करावा लागला. विजय स्टेजवर येताच चाहत्यांनी हातातील पोस्टर दाखवायला सुरुवात केली. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो असं ओरडायला सुरुवात केली. मॉलमध्ये उभं रहायलाही जागा शिल्लक नव्हती. विजयनं सगळ्या चाहत्यांना शांत राहण्याची विनंती केली, आरामात करा असंही म्हटलं. मात्र विजयला पाहून चाहते वेडे झाले होते. विजयला पाहून चाहत्यांना एक धक्काच बसल्याचं दिसत होतं. त्यामुळे परिस्थिती फारच नियंत्रणाबाहेर गेलेली पहायला मिळाली. विजय देवरकोंडाहा अतिशय लोकप्रिय अभिनेता असून त्याच्यासाठी चाहते वेडे असल्याचं पुन्हा एकदा पहायला मिळालं. दरम्यान, 'लाइगर' स्पोर्ट्स अॅक्शन ड्रामामध्ये अनन्या पांडे विजय देवरकोंडा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. फ्रेश जोडी आपल्याला 24 ऑगस्टला सिनेमागृहात पहायला मिळणार आहे. त्यामुळे दोघांचे चाहते खूप उत्साही आणि आनंदी आहेत.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Ananya panday, Bollywood, Social media, Video viral, Vijay deverakonda

    पुढील बातम्या