JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Shahrukh and Salman reunite: किंग खान आणि भाईजान अखेर 20 वर्षांनी येणार एकत्र? चर्चांना उधाण

Shahrukh and Salman reunite: किंग खान आणि भाईजान अखेर 20 वर्षांनी येणार एकत्र? चर्चांना उधाण

करण-अर्जुन (Karan Arjun movie) सिनेमातून समोर आलेली सुपरहिट जोडी शाहरुख आणि सलमान (Shahrukh and Salman together) यांच्या वादाची बरीच चर्चा रंगली होती. पण आता ही जोडी पुन्हा एकदा एका बिजबजेट सिनेमातून कमबॅक करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 4 जुलै: बॉलिवूडमध्ये रंगलेला एक वाद होता किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आणि भाईजान (Salman Khan) सलमानचा. त्यांच्या दोस्तीची मोठी चर्चा रंगत असे. पण एक काळ असाही होता जेव्हा एसआरके आणि भाईजान यांच्यात मोठा अबोला निर्माण झाला होता. पण काही वर्षातच त्यांनी आपलं भांडण मिटवलं. असं असलं तरी हे दोन खान एकत्र कोणत्याच सिनेमात पुन्हा दिसले नव्हते. पण आता फॅन्सनि जलोष करायला हरकत नाही कारण त्यांचे करण अर्जुन पुन्हा एकत्र यायचे संकेत दिसून येत आहेत. शाहरुख आणि सलमान हे आदित्य चोप्राच्या (Shahrukh and Salman reunite) सिनेमात एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करण अर्जुन सिनेमात जेव्हा त्यांची आई मोठ्या आशेने म्हणाली होती, “मेरे करण अर्जुन आयेंगे” त्याच वाक्याचा जयघोष अनेकदा चाहते सुद्धा करत होते. पण आता या दोन्ही सुपरस्टारच्या फॅनबेसने एकत्र मिळून आनंद व्यक्त करायला हरकत नाही कारण शाहरुख आणि सलमान येत्या काळात एका मोठ्या ऍक्शन फिल्मसह पुनरागमन करणार आहेत. ऍक्शन फिल्म हा सलमानचा हातखंडा आहे तर येत्या काळात किंग खान (Shahrukh Khan comeback) सुद्धा एका ऍक्शन फिल्मसह 2023 मध्ये कमबॅक करत आहे. त्यामुळे त्यांना एकत्र एका ऍक्शनपटात पाहायला चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शाहरुखने आदित्य चोप्राच्या बिगबजेट ऍक्शन फिल्मसाठी होकार दिल्याचं समजत आहे तसंच आपल्या जुन्या मित्रासोबत काम करायला सलमानने सुद्धा संमती दिल्याचं समोर येत आहे. ही ऍक्शन फिल्म भारतातल्या काही मोजक्या भव्यदिव्य ऍक्शन फिल्मपैकी एक असणार आहे असं सुद्धा म्हणलं जात आहे.

आजपर्यंत सलमान आणि शाहरुख एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसून आले होते. त्यांची ही भव्य कारकीर्द पाहता या जोडीचा कमबॅक सुद्धा एवढ्या भव्य सिनेमातून होणं रास्त आहे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. हे ही वाचा-  Kaali Poster Controversy: कालीमातेच्या तोंडात सिगरेट अन् हातात LGBT चा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरने नेटकरी संतप्त एका न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार शाहरुख आणि सलमान यांनी बऱ्याच तारखा या चित्रपटासाठी मोकळ्या ठेवल्या आहेत. पण याबद्दल अजून रीतसर घोषणा होणं बाकी असल्याने नक्की कोणत्या गोष्टी कधी बदलतील सांगता येणं अवघड आहे. सध्या तरी या दोन्ही खानच्या फॅन्समध्ये उल्हासाचं वातावरण आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही बातमी ऐकून बरंच आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. काहीच दिवसांपूर्वी शाहरुख आणि सलमान यांचा एकमॆनांसोबत वेळ घालवतानाचा एक विडिओ शोष मीडियावर viral होत होता. हे दोन्ही कलाकार असलेला ग्रँड सिनेमा कसा असेल त्याबद्दल आता बरीच उत्सुकता दिसून येतेय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या